Crime News  saam tv
महाराष्ट्र

Raigad News : मजुराकडून तीन वर्षांच्या चिमुरड्याचं अपहरण; अलिबागमधील धक्कादायक घटना

रायगड (Raigad) जिल्ह्यातील अलिबागमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. अलिबागमध्ये तीन वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण (Kidnap) केल्याची घटना अलिबागमध्ये उघडकीस आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

अलिबाग : रायगड (Raigad) जिल्ह्यातील अलिबागमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. अलिबागमध्ये तीन वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण (Kidnap) केल्याची घटना अलिबागमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणास तपास सुरू केला. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी आरोपीकडून मुलाची सुटका केली आहे. (Raigad Crime News )

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये (Alibaug) तीन वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण केल्याची घटना अलिबागमध्ये घडल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची दखल घेत अलिबाग पोलिसांनी मुलाला पळवून नेणाऱ्या लफंग्याला पकडले आहे. तर पोलिसांनी मुलाची सुटका करीत लहान मुलाला त्याच्या आईच्या ताब्यात दिलं आहे. मधुकर पारधी असे आरोपीचे नाव असून भोपोली येथे राहणारा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मधुकर हा कुरूळ येथे मजुरीचे काम करायचा. त्यावेळी त्याची ओळख अपहरण केलेल्या मुलाच्या कुटुंबाशी झाली. काल मुलाचे आई-वडील बाहेर गेले असताना ३ वर्षांचा संदेश घरात एकटा होता. त्या क्षणाचा गैरफायदा घेत मधुकर याने संदेशला पळवून नेले. त्यानंतर संदेशची आई घरी आली. त्यावेळी त्याच्या आईला संदेश घरात दिसला नाही. त्यामुळे आईने घरात शोधाशोध सुरू केली. घराच्या आजूबाजूला देखील भरपूर शोधले.

मात्र, संदेश कुठेच सापडला नाही म्हणून त्याच्या आईने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर तपासाची सूत्र हलवत पोलिसांनी पेण तालुक्यातील आसाने आदिवासी वाडीवरून आरोपी मधुकर याला ताब्यात घेऊन तीन वर्षांच्या संदेशची सुटका केली. याप्रकरणी अलिबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

Pune News : मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट उमेदवाराला पाठवली नोटीस!

Almond Milk: बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

ITBP Recruitment: १२ वी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना ९२००० रुपये पगार, अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT