Raigad Crime Saam tv
महाराष्ट्र

Raigad Crime : सोशल मिडीयावरील ओळखीतून विवाहबाह्य संबंध; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीची हत्या

Raigad News : मयत कृष्णा याच्या पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने कट रचून पतीची हत्या केली आहे. यासाठी मैत्रिणीला सोबत घेऊन सोशल मीडियावरून पतीला मैत्रिणीच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर प्लॅन करून संपविले

Rajesh Sonwane

सचिन कदम 

रायगड : सोशल मिडियावर एका तरुणाशी ओळख झाल्यानंतर संवाद होऊ लागला. यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. यानंतर महिलेने संबंधित तरुणाशी विवाहबाह्य संबंध ठेवले. मात्र पतीचा अडसर होत असल्याने पत्नीने प्रियकर आणि आपल्या मैत्रिणीच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथून समोर आली आहे. या घटनेने रायगड जिल्ह्यात खडबड उडाली आहे. 

रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे हि धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पाबळ तालुक्यातील पेण येथील रहिवासी कृष्णा नामदेव खंडवी (वय २३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मयत कृष्णा याची पत्नी दिपाली हिची सोशल मीडियावरून उमेश सदु महाकाळ याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये चांगली मैत्री होऊन जवळीक वाढली होती. दरम्यान दीपाली आणि उमेश यांचे विवाहबाह्य प्रेम संबध प्रस्थापित झाले.  

पतीचा काटा काढण्यासाठी मैत्रिणीची मदत  

दरम्यान विवाहबाह्य संबंध ठेवत असताना दीपाली हिला पती कृष्णा याचा अडसर वाटू लागला. यामुळे पतीचा काटा काढण्यासाठी या दोघांनी मैत्रिण सुप्रिया चौधरी हिची मदत घेतली. सुप्रिया हिने सोशल मिडियावर बनावट अकाऊंट उघडून कृष्णाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर पेण येथून नागोठणे येथे कृष्णाला बोलवले आणि नागोठणे येथील वरसगावच्या डोंगर भागात निर्जन ठिकाणी कृष्णाची हत्या केली.  

केमिकल टाकून मृतदेह जाळला 

दरम्यान कृष्णा याला जीवे ठार मारल्यानंतर त्याची ओळख पटू नये; म्हणून मृतदेहावर केमिकल टाकले. तसेच मयत कृष्णा याचा मोबाईल फोडून फेकून दिला असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास करतात धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली असून नागोठणे पोलिस अधिक तपास करीत आहेत.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT