Nanded Crime : पती बेपत्ता असल्याची तक्रार;दीड महिन्यानंतर धक्कादायक माहिती आली समोर, प्रियकराच्या मदतीने नदीत जिवंत फेकले

Nanded News : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचून दारूच्या नशेत असलेल्या पतीला पैनगंगा नदीच्या पुलावरून जिवंत फेकून दिले होते.
Nanded Crime
Nanded CrimeSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: नांदेडच्या किनवट येथे पती बेपत्ता असल्याची तक्रार पत्नीने दिली असताना पोलिसांनी केलेल्या तपासात दीड महिन्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात विवाहबाह्य संबंध असल्याने यात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने दारूच्या नशेत असलेल्या पतीला नदीत जिवंत फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. 

नांदेडच्या किनवट येथे घटना उघडकीस आली आहे. किनवटच्या सिंदगी (मो.) येथील मूळ रहिवासी परंतु गोकुंदा येथे वास्तव्यास असलेले विनोद किशन भगत (वय ५१) यांचा संसार सुरू होता. त्याचवेळी त्यांची पत्नी प्रियंका हिचे किनवट शहरातील ब्रोकरचे काम करणाऱ्या शेख रफीक याच्यासोबत अनैतिक संबंध जुळले. पती विनोद भगत याला याबाबत माहिती पडल्यानंतर अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता. 

Nanded Crime
Shindkheda Accident : अनियंत्रित डंपरने बसस्थानकात उभ्या प्रवाशांना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

प्रियकराच्या मदतीने नदीत जिवंत फेकले 

दरम्यान पत्नी प्रियंका आणि प्रियकर शेख रफीक यांनी संगनमत करून २९ ऑगस्टला रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत असलेल्या विनोद भगत यास मराठवाडा- विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील खरबी पुलावरून जिवंत फेकून दिले. यानंतर मयताची पत्नी प्रियंका हिने ३ सप्टेंबरला किनवट पोलिस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र मयताच्या बहिणींनी भावाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. 

Nanded Crime
Cough Syrup : नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरपचा साठा जप्त; आंतरराज्य टोळीतील दोघे जेरबंद

प्रियकराला ताब्यात घेतल्यानंतर झाला उलगडा 

हाच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान फिर्यादी असलेल्या पत्नीच्या मोबाइलमधील एका क्रमांकावर वारंवार झालेले कॉल पोलिसांना संशयास्पद वाटले. त्या नंबरच्या व्यक्तीला म्हणजे प्रियकर शेख रफीक यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि खुनाचे रहस्य उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर शेख रफिक शेख रशीद आणि पत्नी प्रियंका विनोद भगत या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com