Raigad Crime News Saam Digital
महाराष्ट्र

Raigad Crime News: रायगड जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई, अमलीपदार्थांचा कारखाना उदध्वस्त, १०० कोटींचा साठा जप्त

Raigad Crime News: रायगडच्या खोपोली पोलिसांनी मोठी कारवाई करत अमलीपदार्थ बनवणारा कारखानाच उदध्वस्त केला आहे. या कारवाईत १०० कोटी ५० लाखांचा अमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.

Sandeep Gawade

Raigad Crime News

रायगडच्या खोपोली पोलिसांनी मोठी कारवाई करत अमलीपदार्थ बनवणारा कारखानाच उदध्वस्त केला आहे. या कारवाईत १०० कोटी ५० लाखांचा अमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. तर 15 लाख रुपयांचे कच्चे रसायन आणि 65 लाखांची यंत्र सामुग्री जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी मोस्ट वॉन्टेड सह तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली खोपोलीतील ढेकू गावात अमलीपदार्थांचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून खोपोली पोलिसांनी या कारखान्यावर धाड टाकली. मात्र तिथे सुरू असलेला प्रकार पाहुन पोलीसही चक्रावले. चक्क अमलीपदार्थ बनवण्याचा कारखानाच सुरू होता. पोलिसांनी तात्काळ कारखाना सील केला आणि अमलीपदार्थांचा साठा, साहित्य जप्त केले. अमलीपदार्थ आणि साहित्याची किंमत अंदाजे तब्बल १०७ कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या नेतृ्त्वात ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT