Mahad MIDC News: 2 More Dead Bodies Recovered Mahad Blast Latest new- Saamtv
महाराष्ट्र

Mahad MIDC News: महाड MIDC दुर्घटना! चौथ्या दिवशी आणखी २ मृतदेह सापडले; मृतांचा आकडा ९ वर

Mahad MIDC Blast Update: या दुर्घटनेतील मृतांचा आकडा नऊ झाला असून दोन बेपत्ता कामगारांचा शोध सुरु आहे.

Gangappa Pujari

सचिन कदम, प्रतिनिधी

Mahad MIDC Blast:

रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी येथील ब्लू जेट हेल्थकेअरमध्ये शुक्रवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये आत्तापर्यंत ७ जणांचे मृतदेह सापडले असून ३ बेपत्ता कामगारांचा गेल्या दोन चार दिवसांपासून शोध सुरू होता. अखेर आज चौथ्या दिवशी आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. यासोबतच मृतांची संख्या आता ९ वर पोहोचली असून दोन मृतांचा शोध सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  महाड एमआयडीसीतील (Mahad MIDC) ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीत शुक्रवारी भीषण स्फोट झाला. वायू गळतीमुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून४ कामगार अद्यापही बेपत्ता होते. घटनेनंतर गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता कामगारांचा शोध सुरु होता. मात्र स्फोटामुळे इमारत धोकादायक बनल्याने शोधकार्यात अडथळे येत होते.

अखेर आज अपघाताच्या चौथ्या दिवशी आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. आग आणि स्फोटामुळे इमारती धोकादायक बनल्याने असल्याने बचाव पथकांच्या सुरक्षिततेचा विचार करून बचाव कार्यात बदल करत आला होता. आज दोन मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतांचा आकडा नऊ झाला असून दोन बेपत्ता कामगारांचा शोध सुरु आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, या दुर्दैवी घटनेने मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांच्या नातेवाईकांना कंपनीतर्फे ३० लाख रुपये, मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आमि विमा कंपनीच्या माध्यमातून ९ ते १८ लाख रुपये, अशी एकूण ४५ लाख रुपयांपर्यंत मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार भरत गोगावले यांनी दिले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT