Supreme Court: 'राज्यपालांना आत्मपरीक्षणाची गरज, तुम्ही जनतेतून निवडलेले लोकप्रतिनिधी नाही..' सुप्रीम कोर्टाने फटकारले

Supreme Court News: राज्य सरकारे न्यायालयात आल्यावरच राज्यपाल विधेयकांवर निर्णय का घेतात? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे.
Supreme Court News
Supreme Court NewsSaamtv
Published On

Supreme Court Slams Panjab Governer:

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे त्यांच्या स्पष्ट, बेधडक आणि कडक निर्णयांसाठी ओळखले जातात. अनेक महत्वांच्या याचिकांवर त्यांनी दिलेले निर्णय हे लक्षवेधी ठरत असतात. पंजाब सरकारमधील एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधिशांनी महत्वाचे निरिक्षण नोंदवले असून देशातील राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंजाब सरकारने (Panjab Government) राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी काही महत्त्वाची विधेयके विनाकारण अडवून ठेवली आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने इतर राज्यांमध्येही अशीच स्थिती असल्याचे सांगत राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

"राज्यपालांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी नाहीत याची जाणीव राज्यपालांनी ठेवावी. राज्य सरकारे न्यायालयात आल्यावरच राज्यपाल विधेयकांवर निर्णय का घेतात? हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यावरच राज्यपाल काम करतात, हे थांबायला हवे, प्रकरण न्यायालयात येण्यापूर्वीच राज्यपालांनी कारवाई करावी.." असे न्यायालयाने म्हणले आहे.

Supreme Court News
Jalna News: जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक बिनविरोध; कट्टर विरोध आले एकत्र

तसेच राज्यपाल एकतर विधेयकांना मंजुरी देण्यास नकार देऊ शकतात, ती राष्ट्रपतींकडे शिफारसीसाठी पाठवू शकतात किंवा मग त्यांना ती एकदा परत विधिमंडळाकडे परत पाठवण्याचा अधिकार आहे. असेही न्यायालयाने म्हणले आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १० नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. (Latest Marathi News)

Supreme Court News
Gram Panchayat Result: ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com