रायगड भूषण पुरस्काराची पुन्हा खैरात; अडीचशेहून अधिकांना पुरस्कार जाहीर SaamTvNews
महाराष्ट्र

रायगड भूषण पुरस्काराची पुन्हा खैरात; अडीचशेहून अधिकांना पुरस्कार जाहीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- राजेश भोस्तेकर

रायगड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी पक्षाने रायगड भूषण पुरस्काराची घोषणा केली आहे. यावेळी चक्क साधारण अडीचशेहुन अधिक जणांना रायगड भूषण पुरस्काराची खैरात करण्यात आली आहे. रायगड भूषण पुरस्काराचे वितरण सोहळा 6 मार्च रोजी दुपारी 2 वाजता अलिबाग पीएनपी नाट्यगृह येथे होणार आहे. पालकमंत्री अदिती तटकरे याच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

हे देखील पहा :

रायगड जिल्ह्यातील विशेष नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना रायगड भूषण पुरस्काराने जिल्हा परिषदेतर्फे सन्मानित केले जाते. तत्कालीन रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आताचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या काळात रायगड भूषण पुरस्कार सुरू करण्यात आला. पहिल्यावेळी ठराविक व्यक्तींना हा मानाचा रायगड भूषण पुरस्कार दिला जात होता. मात्र, त्यानंतर या पुरस्काराला राजकीय स्वरूप प्राप्त झाल्याने त्याचे महत्व कमी होऊ लागले आहे.

गेल्या चार पाच वर्षात रायगड भूषण पुरस्काराची संख्या ही शंभरीच्या वर जाऊ लागली. रायगड भूषण हा मानाचा पुरस्कार म्हणून पाहिले जात होते. मात्र, काही वर्षात या पुरस्कार प्राप्त व्यक्तीची संख्या पाहता त्याचे महत्व कमी झाले आहे. रायगड भूषण पुरस्कार हा उल्लेखनीय आणि वैशिष्ट्य पूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.

यासाठी समिती नेमून हे पुरस्कार प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तीची निवड करून देणे अपेक्षित होते. यासाठी जिल्हा परिषदेच्या बैठकीत समिती तयार करण्याची चर्चा ही झाली होती. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून कामही सुरू करून तसा प्रस्तावही तयार करून अध्यक्षांकडे दिला. मात्र, पुन्हा कुठेतरी माशी शिंकली आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी पुरस्काराची अवस्था झाली आहे.

आगामी काळात रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत याचा फायदा मिळावा यादृष्टीने जिल्ह्यातील अडीचशेहुन अधिक व्यक्तींना रायगड भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्ती ह्या आपापल्या क्षेत्रात मोठेच आहेत. मात्र पुरस्काराची संख्या पाहता सत्ताधारी, विरोधक आणि जिल्हा परिषद प्रशासनाने या पुरस्काराचे महत्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: एक-दोन नाही तर २०२४ मध्ये इतक्या वेळा शून्यावर बाद झालाय विराट!

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT