पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली, पालकमंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन SaamTvNews
महाराष्ट्र

पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली, पालकमंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

257 जणांना रायगड भूषण पुरस्कार; ढिसाळ नियोजनामुळे पुरस्कार वितरण समारंभात गोंधळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- राजेश भोस्तेकर

रायगड : समाजासाठी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना मिळालेला रायगड भूषण पुरस्कार (Raigad Bhushan Puraskar) हा जिल्ह्याचा सन्मान आहे. त्यामुळे पुरस्कारप्राप्त व्यक्तीवर जबाबदारी वाढली असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिपादन केले आहे. जिल्ह्यातील 257 जणांना पुरस्कार देताना ढिसाळ नियोजनामुळे रायगड (Raigad) भूषण पुरस्कार वितरण समारंभात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

हे देखील पहा :

अलिबाग (Alibag) येथील पीएनपी नाट्यगृहात रायगड भूषण पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला. आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घरे, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे, अर्थ व बांधकाम सभापती एड. नीलिमा पाटील, कृषी सभापती बबन मानवे, महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव आदी  मान्यवर यावेळी उपस्थित होते.

257 जणांना पुरस्काराचे एकाच कार्यक्रमात वितरण करण्यात आले.  एकावेळी 5 जणांची नावे पुकारून पुरस्कार वितरण केले जात होते. ढिसाळ नियोजनामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. आपल्या तालुक्यातील पुरस्कार विजेत्यांसोबत नेते व्यासपीठावरच फोटो काढण्यात व्यस्त होते. पुरस्कार विजेत्यांनी कॉरिडॉरमध्ये गर्दी केली होती. अखेर निवेदकांना या सर्वांना समज द्यावी लागली.

एकाच वेळी एवढ्या मोठया संख्येने पुरस्काराचे वितरण होत असल्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये टिका झाली होती. त्याची दखल पालकमंत्री अदिती तटकरे यांनी घेतली. रायगड भूषण पुरस्काराचे वितरण प्रत्येक वर्षी करावे. त्यांची संख्या मर्यादित ठेवावी अश्या शब्दात पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आयोजकांची कानउघडणी केली. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता पारधी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी प्रास्ताविक केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : हिंजवडीतील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Bail Pola : सातपुड्यात आहे बैलांचे ब्युटी पार्लर; पोळ्यासाठी महिला तयार करतात खास बैलांचा शृंगार

Raigad: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात बोट बुडाली, अनेकजण अडकल्याची भीती, थरारक VIDEO समोर

'नोरा फतेहीसारखी फिगर बनव' ३ तास जिम अन् उपाशी ठेवलं; पतीकडून पत्नीचा अतोनात छळ

Neena Gupta: 'त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना हेवा वाटतो...' शॉर्ट्स घातल्याबद्दल ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला नीना गुप्तांचं बेधडक उत्तर

SCROLL FOR NEXT