Raigad : संत गाडगेबाबांनी उद्घाटन केलेल्या चोंढी प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था! SaamTvNews
महाराष्ट्र

Raigad : संत गाडगेबाबांनी उद्घाटन केलेल्या चोंढी प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था!

किहीम येथील दानशूर आणि संत गाडगेबाबा यांचे शिष्य कै. दत्ताराम गणपतराव शेटे यांनी आपल्या जागेत 1951 साली सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- राजेश भोस्तेकर

रायगड : स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची (PHC) दुरवस्था झाली आहे. किहीम येथील दानशूर आणि गाडगेबाबा (Sant Gadge Baba) महाराज यांचे शिष्य कै. दत्ताराम गणपतराव शेटे यांनी आपल्या जागेत 1951 साली सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले होते. त्याकाळी रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळत होती. मात्र, सध्या या आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली असून हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची मागणी शेटे कुटूंबाने जिल्हा परिषदेकडे केलेली आहे.

हे देखील पाहा :

आपल्या आजोबांचे नाव या रुग्णालयाला (Hospital) देऊन त्याचे स्मारक रुपात रुग्णालय पुन्हा उभारावे अशी मागणी करून यासाठी एक लाखाची देणगी देण्यासही समर्थता दाखवली आहे. स्वातंत्र्य काळाच्या पूर्वार्धात जनतेला योग्य आरोग्य सेवा मिळावी यासाठी अलिबाग (Alibag) तालुक्यातील किहीम गावचे दानशूर व्यक्तिमत्व आणि संत गाडगेबाबा महाराज यांचे शिष्य कै. दत्ताराम गणपतराव शेटे यांनी बाबांच्या आशीर्वादाने चोंढी येथे पंचक्रोशीतील नागरिकांसाठी 1951 साली प्राथमिक आरोग्य केंद्र स्वतःच्या जागेत आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ, "कै. आनंदीबाई दत्ताराम शेटे, धर्मार्थ दवाखाना" नावाने उभारले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन स्वच्छतेचे प्रणेते गाडगेबाबा महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गाडगेबाबा याचे किर्तनही झाले होते.

प्राथमिक आरोग्य केंद्र हे जिल्हा लोकल बोर्डाला दान केले होते. यावेळी जिल्हा रुग्णालयाचीही स्थापना झाली नव्हती. त्याआधी पासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवा दिली जात होती. बैठ्या इमारतीत दोन खोल्यांसह, त्या वेळच्या संपूर्ण आधुनिक उपकरणा सहित, सुसज्ज असा दवाखाना व सुतिका गृह (मॅटर्निटी) उभारले होते. आजही पंचक्रोशीतील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या (ZP) आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवा दिली जात आहे. कोरोनाच्या महामारीने आरोग्य यंत्रणा सक्षम असणे किती महत्वाचे आहे याचे उदाहरण साऱ्या जगाने अनुभवत आहे. चोंढी येथील या आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाकडून कोरोना काळात लसीकरण, तपासण्या करण्यात आल्या आहेत.

स्वातंत्र्य काळातही अलिबाग ते रेवस विभागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मोफत दिली जात होती. अनेक महिलांच्या प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रात झाल्या आहेत. सध्या इमारतीच्या भिंतीला तडे गेले आहेत. छतातून पाणी गळत असल्याने प्लास्टिक आवरण करण्यात आले आहे. गाडगेबाबा याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 71 वर्षापूर्वी बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे.

ऐतिहासिक ठेवा असलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा नव्याने बांधण्यात यावे अशी मनोकामना शेटे कुटूंबाने व्यक्त केली आहे. याबाबत दत्ताराम शेटे याचे नातू डॉ आशिष शेटे यांनी जिल्हा परिषदेकडे नवीन बांधकाम करण्याबाबत अर्ज केलेला आहे. याला जिल्हा परिषदेनेही सहकार्याची आशा व्यक्त केली आहे. मात्र यासाठी त्वरित पावले उचलली तर सुसज्ज रुग्णालय उभारले जाईल आणि परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळू शकेल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार १५ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

SCROLL FOR NEXT