Rahul Narwekar Saam TV
महाराष्ट्र

Rahul Narwekar: आमदार अपात्रता प्रकरणात सरन्यायाधीशांनी फटकारल्यानंतर राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'अद्याप माझ्यापर्यंत

Ruchika Jadhav

MLA Disqualification:

सुप्रीम कोर्टात आज आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारले. यावरून राहुल नार्वेकरांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप माझ्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयातील कोणतीही माहिती आलेली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

दिरंगाई होणार नाही

माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकरांनी म्हटलं की, अद्याप मला सर्वोच्च न्यायालयातील कोणतीही माहिती मिळाली नाही. संपूर्ण माहिती जाणून घ्यावी लागेल. त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल. विधानसभा अध्यक्ष हे पद संवैधानिक आहे असं सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आहे.", असं राहुल नार्वेकर म्हणाले.

दरम्यान, पुढे त्यांनी म्हटलं की, "कारवाईला यावेळी कोणतीही दिरंगाई होणार नाही. लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेतला जाईल. निर्णय घेताना कोणतीही घाई केली जाणर नाही.", असं नार्वेकरांनी यावेळी स्पष्ट केलं.

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड काय म्हणाले?

नार्वेकरांना फटकारताना न्यायालयाने म्हटलं की, "न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा आदर करायलाच हवा. विधानसभा अध्यक्ष घटनेच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत कार्यवाही अनिश्चित काळासाठी लांबवू शकत नाहीत. विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्यामध्ये सुनावणी करून त्याबाबतची रूपरेषाही ठरवावी कार्यवाही करावी. तसेच दोन आठवड्यानंतर त्याबाबतची सगळी माहिती सुप्रीम कोर्टात द्यावी", असं न्यायालयाने म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT