Rahul Gandhi  Saam Digital
महाराष्ट्र

Rahul Gandhi : संविधानात शिवरायांची विचारधारा! राहुल गांधींनी कोल्हापुरातून महाराष्ट्राला केलं मोठं आवाहन

Rahul Gandhi On Shivaji Maharaj : शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांसारखे लोक इतिहासात झाले नसते तर संविधान बनलं नसतं आणि या महापुरुषांच्या विचारातून जन्माला आलेलं संविधान

Sandeep Gawade

शिवाजी महाराजांचा पुतळा हा केवळ पुतळा नाही. मूर्ती त्यावेळीच बनवली जाते, ज्यावेळी त्यांच्या विचारधारेचं मनापासून समर्थन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला, जगाला कोणता संदेश दिला होता. शिवाजी महाराजांनी जे सांगितलं, त्याचा अनुवाद म्हणजे आजचं आपलं संविधान आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांसारखे लोक इतिहासात झाले नसते तर संविधान बनलं नसतं आणि या महापुरुषांच्या विचारातून जन्माला आलेलं संविधान आज संपवण्याचा कट रचला जात असल्याचा घणाघात, राहुल गांधी यांनी आज कोल्हापुरातील सभेत केला.

शिवाजी महाराज ज्याच्यासाठी आयुष्यभर लढले, त्यांच्यासाठी आपण लढलो नाही तर त्या मूर्तीला काही अर्थ राहात नाही. शिवाजी महाराज ज्याच्यासाठी लढले, ज्याप्रकारे आपलं आयुष्य पणाला लावलं. त्यांच्या इतकं नाही पण त्यांच्या जे केलं त्यातील थोडं तरी आपल्याला पण केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला, जगाला कोणता संदेश दिला होता. शिवाजी महाराजांनी जे सांगितलं, त्याचा अनुवाद म्हणजे आजचं आपलं संविधान आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांसारखे लोक इतिहासात झाले नसते तर संविधान बनलं नसतं.

भारतात सध्या दोन प्रकारच्या विचारधारा आहेत. एक समानता, बंधुतावर भर देते आणि दुसरी विचारधारा जी शिवाजी महाराजांसारख्या विचारधारेतून निर्माण झालेल्या संविधानाला संपूवण्याची रोज भाषा करते. शिवाजी महाराजांच्या काळातही ही लढाई सुरू होती. शिवाजी महाराजांचाही राज्याभिषेकाला विरोध केला. त्यामुळे ही हजारो वर्षांपासूनही लढाई सुरू आहे.

रोज सकाळी हे लोक उठतात आणि संविधानाची विचारधारा संपवण्याची भाषा करतात. संस्थांचा गैरवापर केला जातो. भीती घातली जाते, लोकांना धमकवलं जातं आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माथा टेकण्यासाठी जातात. या अशा विचारधारेविरोधात लढलं पाहिजे. कॉंग्रेस या विचारधारेविरोधात लढण्याचं काम करत आहे.

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील मुर्ती कोसळली कारण यांची नियत चांगली नव्हती. त्यामुळे यापुढे हे लोक जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा, त्यांनी प्रतिमा बनवताना आधी विचारधारा आत्मसात करायला सांगा. महाराष्ट्राच्या मातीत शिवाजी महाराज जन्माला आले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेत संविधान वाचवण्याची ताकद आहे. यावेळी ती ताकद दाखवायची वेळ असल्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT