raghunath dada patil demands to cancel aerial distance between two sugar factories saam tv
महाराष्ट्र

Raghunath Dada Patil News : ...तर साखर कारखान्याच्या अंतराची अट काढून टाका : रघुनाथदादा पाटील

विजय पाटील

Sangli News :

ऊसाला पाच हजार भाव देणे शक्य नसेल तर साखर कारखान्याच्या अंतराची अट काढून टाका अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील (raghunath dada patil) यांनी केली आहे. दरम्यान कारखानदार म्हणजे अलिबाबा चाळीस चोर झाले आहेत अशी टीका देखील पाटील यांनी सांगली (sangli latest marathi news) येथे केली. (Maharashtra News)

पाटील म्हणाले ट्रॅक्टर आणि शेती साहित्यांच्या बाबतीत केंद्र सरकारचा एमआरपीचा कायदा आहे. परंतु कंपन्या त्याचे पालन करीत नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. या लुटारु कंपन्यांच्या प्रमुखांना पद्मविभूषण, पद्मश्री पुरस्कार दिले जाताहेत. केंद्र सरकारची ही भूमिका याेग्य नसल्याचे पाटील यांनी नमूद केले.

दरम्यान शेतक-यांच्या उसाला योग्य भाव देण्याऐवजी साखर सम्राटांकडून लूटण्याचा उद्योग सुरु आहे असेही पाटील यांनी म्हटले. ते म्हणाले ऊसाला पाच हजार रुपये दर देणे हे साखर कारखान्यांना सहज शक्य आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जर त्यांना ते देता येत नसेल तर दोन कारखान्यातील अंतराची अट काढून टाकावी अशी मागणी देखील शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. हे कारखानदार म्हणजे अलिबाबा चाळीस चोर झालेत अशी टिप्पणी पाटील यांनी कारखानदारांवर केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT