Karul Ghat Closure: करुळ घाट ३१ मार्चपर्यंत वाहतुकीस राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून घाटातील वाहतुक बंद ठेवण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
sindhudurg news karul ghat to remain closed from 22 january
sindhudurg news karul ghat to remain closed from 22 january saam tv
Published On

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

करुळ घाटातील (karul ghat latest marathi news) रस्ता मजबुतीकरण व दुप्पदरीकरणाच्या कामासाठी सोमवारपासून (ता. २२) ३१ मार्च २०२४ पर्यंत म्हणजेच सुमारे अडीच महिने घाटातील वाहातुक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी काढला आहे. करुळ घाटातील वाहतुक फोंडा घाट (phonda ghat), भुईबावडा घाट (bhuibavda ghat) व अनुस्कारा घाटातून (anuskura ghat) वळविण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे. (Maharashtra News)

तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील (talere kolhapur national highway) करुळ घाटाचे मजबुतीकरण व रुंदीकरण काम सुरु करण्यात आले आहे. तर लवकरच रस्त्याचे काॅक्रींट करण्याचे काम करण्यात येणार आहे. या दरम्यान करुळ घाटातुन ऐकेरी वाहातुक चालु ठेवणे शक्य नसुन अपघात होण्याची शक्यता आहे. घाटमार्गात रस्ता जेमतेम ७ किलाे मीटर रुंदीचा आहे. तसेच रस्ता तीव्र चढ उतार, वेडीवाकडी धोकादायक वळणे असून घाटातून अवजड वाहने, ट्रेलर यांची सतत वर्दळ असते.

sindhudurg news karul ghat to remain closed from 22 january
Pali Khandoba Yatra 2024: 'पाल'ची खंडेरायाची यात्रा... २० ते २८ जानेवारी वाहतुकीत माेठा बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

घाटमार्ग दुपदरीकरणाचे काम राञंदिवस विना अडथळा होणे करीता १५ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ दरम्यान सर्वप्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाकडून अहवाल घेऊन २२ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ दरम्यान घाटमार्ग बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

पर्यायी मार्ग

दरम्यान करुळ घाटातील वाहतूक ही मुख्यतः फोंडा घाटातून प्रवाशी व अवजड तर भुईबावडा घाटातुन फक्त प्रवाशी वाहतूक तसेच अनुस्कुरा घाटातून प्रवाशी व अवजड वाहतूक सुरु ठेवण्यात येणार आहे असे आदेश जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

sindhudurg news karul ghat to remain closed from 22 january
Kolhapur: 'ते एकनाथ शिंदेंना साेडून जाणार नाहीत' (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com