Radhakrishna Vikhe Patil reacts to Manoj Jarange Patil’s hunger strike announcement amid the ongoing Maratha reservation agitation in Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

... तर मी राजीनामा देईल; मंत्री विखे पाटील यांचं खळबळजनक विधान, महायुतीत काय घडतंय?

Maratha Reservation Vikhe Patil Big Statement Resignation: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी 30 मेपासून आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. याच दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं विधान करत उपसमिती अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

Omkar Sonawane

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्या सरकारविरोधात एल्गार पुकारला असून थेट आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. जरांगे येत्या 30 मेपासून उपोषणाल सुरुवात करणार आहेत. त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सातारा गॅझेट लागू करावे या सर्व मागण्याही त्यांनी केल्या आहेत. दरम्यान मनोज जरांगे यांनी उपोषणच हत्यार पुन्हा उपसल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आरक्षणविषयी सरकारची भूमिका मांडली आहे. तसेच माझ्या राजीनाम्याने जरांगे पाटील यांचे समाधान होत असेल तर मी उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे.

तर मी राजीनामा द्यायला तयार आहे

आतापर्यंत आपण मराठा आरक्षणासंदर्भात जे जे काही निर्णय घेतले त्यांना कुठल्याही न्यायालयाने स्थगिती दिली नाही. आंदोलनादरम्यान निधन झालेल्या मराठा आंदोलकांच्या मुलांना नोकरीमध्ये सामावून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. एसटी महामंडळात आम्ही त्यांना नोकरी द्यायला तयार होतो, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही, आता महावितरण आणि एमआयडीसीमध्ये नोकरी देण्यासंदर्भात आम्ही विनंती केली आहे, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तसेच उपसमितीचा अध्यक्ष म्हणून माझा राजीनामा दिल्याने जरांगे पाटलांचे समाधान होत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असे मोठे विधान विखे पाटील यांनी केले.

मनोज जरांगे यांची भेट घेणार

तसेच मी लवकरच मनोज जरांगे पाटलांना भेटेल आणि आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती त्यांना देईल. त्यांचे काही गैरसमज असतील ते मी दूर करण्याचा प्रयत्न करेल, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Cake Recipe : ना मैदा, ना साखर... घरच्याघरी १५ मिनिटांत बनवा टेस्टी अन् स्पाँजी केक, मधुमेही रूग्णही बिनधास्त खाऊ शकतील

पेट्रोल-डीझेलनंतर पुन्हा महागाईचा भडका, गोकुळकडून गायीच्या दुधाची दरवाढ, 'या' तारखेपासून लागू

राज्य सरकारची नवी योजना; तिसऱ्या मुलासाठी ३० हजार अन् चौथ्या अपत्यासाठी देणार ४० हजार रुपये; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra News Live Update: महावितरणाच्या बैठकीत अंबादास दानवे आक्रमक

Budhaditya Rajyog: शनी जयंतीच्या दिवशी बनला बुधादित्य राजयोग; आजपासून या ४ राशींचं नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT