Bullock Cart Race Ghat old man Dance SaamTV
महाराष्ट्र

Pune Bailgada Race : आलो ज्या मातीत, निधड्या छातीनं; बैलगाडा शर्यतीत आजोबांचा जलवा, कोलांटउड्या अन् दंड थोपटत जल्लोष

Pune Bailgada Sharyat : चांगदेव शेंडगे या ८० वर्षांच्या आजोबांनी बैलगाडा शर्यतीच्या घाटात पहिला नंबरचे ट्रॅक्टरचे बक्षीस जिंकल्यानंतर बैलगाडा घाटात कोलांटउड्या घेत जोर बैठका काढल्या.

Prashant Patil

रोहिदास गाडगे, साम टीव्ही

पुणे : बैलगाडा घाटात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला अन शर्यतीच्या घाटात आपली बारी पहिल्या नंबर मध्ये बसल्यानंतर ८० वर्षांचे आजोबांनी बैलगाडा घाटात कोलांटउड्या घेत, जोर बैठका घेत आणि आपले दंड थोपटत आनंद व्यक्त केलाय. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

बैलगाडा घाटात जल्लोष करणारे आजोबा पुण्याच्या वाघोली येथील आहेत. चांगदेव शेंडगे या ८० वर्षांच्या आजोबांनी बैलगाडा शर्यतीच्या घाटात पहिला नंबरचे ट्रॅक्टरचे बक्षीस जिंकल्यानंतर बैलगाडा घाटात कोलांटउड्या घेत जोर बैठका काढल्या. तेव्हा त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.

पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात सध्या जत्रा आणि वेगवेगळे उत्सव सुरू आहे. आता या जत्रेत बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला आहे. इथे झालेल्या बैलगाडा शर्यतीत ८० वर्षांचे आजोबा चांगदेव शेंडगे यांच्या बारीचा पहिला क्रमांक लागला. मग चांगदेव आजोबा भलतेच खूश झाले. त्यांनी शर्यतीत एखाद्या तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने कोलांटउड्या मारल्या. जोर बैठकाही लगावल्या. एवढंच काय, आजोबांनी दंड थोपटत एकच जल्लोष केला.

आता जेव्हा ८० वर्षांचे आजोबा बैलगाडा घाटात कोलांटउड्या घेत जोर बैठका काढतात तेव्हा आजोबांचे शर्यती प्रतीचे प्रेम पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मग पोरांनी एकच कल्ला केला. शिट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटात आजोबांचं सगळ्यांनी कौतुक केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thailand Bangkok Shooting : भर बाजारात अंदाधुंद गोळीबार! ६ जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

Skin Care Tip: बटाटा लावा आणि चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

SCROLL FOR NEXT