Police Sub Inspector Amol Ghodke suspended Saam Tv News
महाराष्ट्र

Pune Crime : थेऊर हत्या प्रकरण; मुख्य आरोपीला अप्रत्यक्षरित्या मदत, पुण्यातील PSI निलंबित

Theur murder Case Police Amol Ghodke Suspended : थेऊर येथील दाखल गुन्ह्यातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी थेऊर येथील घडलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी भरत जैद याला अप्रत्यक्षरित्या मदत केली.

Prashant Patil

पुणे : महिलेच्या डोक्यात दगड घालून, तसेच पतीवर पिस्तुलातून गोळीबार करून पसार झालेल्या सर्व आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दगड मारल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेल्या गुन्हेगारास स्थानिक पोलिसाने मदत केल्याची धक्कादायक माहिती आता उघडीस आली आहे. तपासात पोलिसाने गुन्हेगारास अप्रत्यक्षरित्या मदत केल्याचं तपासात समोर आल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कर्तव्यास असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी काढला आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात थेऊर येथील दाखल गुन्ह्यातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी थेऊर येथील घडलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी भरत जैद याला अप्रत्यक्षरित्या मदत केली. हा गुन्हा घडला त्यावेळी घटनास्थळी आरोपी हजर नव्हता, असं साक्षीदार सुदर्शन यशवंत आगळने आणि प्रतिक रमेश बिटे यांच्या तपासात समोर आलं आहे. परंतु लोणी काळभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केलेल्या तपासादरम्यान भरत जैद हा घटना घडली त्यावेळी घटनास्थळी हजर असल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT