strike against mpsc
strike against mpsc saam tv
महाराष्ट्र

पुण्यात शेकडो विद्यार्थ्यांनी केलं आंदोलन, 'MPSC' कडे केली 'ही' मागणी

साम टिव्ही ब्युरो

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अनागोंदी कारभाराविरोधात एमपीएससी स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांनी (Pune Students strike) अलका टॉकीज चौकात एमपीएससी आयोगाविरोधात आंदोलन सरु केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील (Preliminary Examination) काही प्रश्न रद्द झाले. त्यानंतर एमपीएससी आयोगाविरोधात विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या परीक्षेची मुख्य परीक्षा गेल्या तीन महिन्यांपासून रखडली आहे. या पार्श्वभूमीवर शेकडो विद्यार्थ्यांनी एमपीएससी विरोधात आंदोलन केले. एमपीएससीने (MPSC) या गंभीर विषयावर तो़डगा काढावा,अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्तही लावण्यात आलाय. आयोगाने जे प्रश्न बरोबर होते, ते बरोबर द्यावेत व फेर निकाल लावून परीक्षा लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आंदोलन मागं घेतलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

SCROLL FOR NEXT