Pune-Solapur highway Accident unknown vehicle collided car 4 women dead 6 injured Saam TV
महाराष्ट्र

Solapur Accident News: पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात; ४ महिला भाविकांचा जागीच मृत्यू

Solapur Accident News: पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील चार महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

विश्वभूषण लिमये

Pune Solapur Highway Accident News: सोलापूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील चार महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील अपघातग्रस्त (Accident) महिला भाविक रांजणगाव (ता. पारनेर जिल्हा अहमदनगर) येथून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, कार मोहोळ तालुक्यातील यावलीजवळ आली असता, बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की कारमधील तीन महिलांचा जागीच तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांची ओळख पटली नसून पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे. अपघातामधील मृत हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निकतवर्तीय नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : दह्यामुळे कॅन्सर? नागपुरात ४ हजार किलो दही जप्त,नेमका प्रकार काय? |पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: Pune: वारजे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Sand Mafia : वाळू माफियांची मुजोरी; तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pitra Dosh 2025: पितृ दोष असल्यास जीवनात 'हे' संकेत मिळतात

PUNE: बड्या नेत्याच्या बर्थडे पार्टीत भयंकर घडलं, मिरवणुकीदरम्यान DJ वाहनानं ६ जणांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT