Nashik News: टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन; सिन्नर तालुक्यातील दुर्देवी घटना

Nashik Crime News: भैरवनाथ हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थीनीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
Nashik Crime News 17 years old School girl ended her life due to harassment from young boy
Nashik Crime News 17 years old School girl ended her life due to harassment from young boySaam TV
Published On

Nashik Crime News: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहा गावात श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थीनीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. वैष्णवी नवनाथ जाधव असं, मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. (Latest Marathi News)

Nashik Crime News 17 years old School girl ended her life due to harassment from young boy
Dombivali News: डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; महापालिकेकडून डी-कंजेक्शनचा प्लान तयार

वैष्णवीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गावातील तीन तरुणांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते. मी जीव देण्याचं कारण फक्त वैभव आणि त्याचे दोन मित्र आहेत, असं वैष्णवीने चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं.

तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून वावी पोलीस ठाण्यात (Nashik Police) तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, वैष्णवी शहा गावातील श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती.

दोन दिवसांपूर्वी शाळेच्या परिसरात (Nashik News) टवाळखोरी करत मुलींना त्रास देणाऱ्या गावातील तीन तरुणांसोबत तिचा वाद झाला होता. या तीन तरुणांनी घरी येत तिचे वडील नवनाथ जाधव यांना तिच्याबद्दल वाईट सांगून त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की देखील केली होती.

Nashik Crime News 17 years old School girl ended her life due to harassment from young boy
Navneet Rana Threatened: खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

गावातील काही ग्रामस्थांनी हे भांडण सोडवत त्या मुलांना समज देऊन जायला सांगितले होते. मात्र हे तीनही मुले गुंड प्रवृत्तीची असल्यामुळे वैष्णवीच्या मनात भीती होती. आपल्यामुळे हे तरुण कुटुंबीयांना पुन्हा त्रास देतील, या भीतीने वैष्णवीने टोकाचं पाऊल उचललं.

मंगळवारी रात्री घरातील सर्वजण झोपी गेल्यानंतर तिने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून वावी पोलिसांनी टवाळखोर तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com