Datta Gawde plan to end his life Saam Tv News
महाराष्ट्र

Datta Gade Shirur : दत्ताजवळ विषाची बॉटल, गळ्यावर दोरीचे व्रण, आयुष्य संपवण्याचा विचार; पण 'त्या' कारणामुळे प्लॅन फसला

Pune Swargate Rape Case : दत्ता गाडे याच्या जवळ विषाची बॉटल आढळली आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? असा प्रश्न पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना विचारला गेला.

Prashant Patil

पुणे : स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याने आपल्याजवळ किटकनाशकांच्या दोन बाटल्या बाळगल्या होत्या. पोलीस अटक करण्यापूर्वीच विष पिऊन आत्महत्या करण्याचा त्याचा प्लॅन होता. मात्र, पोलिसांनी आरोपीला घेरल्यानंतर काही गावकऱ्यांनी त्याला बोलण्यात गुंतवलं. तेवढ्यात पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या, अशी माहिती समोर आली होती. अशातच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा केला आहे.

दत्ता गाडे याच्या जवळ विषाची बॉटल आढळली आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? असा प्रश्न पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना विचारला गेला. त्यावेळी अमितेश कुमार यांनी सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली अन् उत्तर दिलं. तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे. आरोपीचा प्राथमिक तपासणी झाली, तेव्हा त्याच्या गळ्यावर काही दोरीचे व्रण आहेत. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. दोरी तुटल्याने दत्ता गाडे वाचला, असं अमितेश कुमार यांनी सांगितलं.

ग्रामस्थ पोहोचल्याने दत्ता गाडेचा आत्महत्येचा प्रयत्न फसला. पण खरंच झालं होतं का? हे तपासण्यासाठी टीम तिथं जावी लागेल. पण आरोपीचा प्राथमिक आरोग्य तपासणी अहवालावरून त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण दिसत होते, असं अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT