महापालिका निवडणुकांच्या आधीच महायुतीत वादाची ठिणगी पडलीय.. आणि त्याला कारण ठरलंय पुण्यातील गुन्हेगारी...याच गुन्हेगारीवरुन धंगेकरांकडून चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केलं जातंय.. या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समज दिल्यानंतरही रवींद्र धंगेकरांनी तलवार म्यान न करता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांवर जोरदार प्रहार केलाय... चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून मकोका लावण्याचा कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोपच धंगेकरांनी केलाय..
खरं तर या आरोप-प्रत्यारोपांची सुरुवात झाली ती कुख्यात गुंड निलेश घायवळ पोलीस यंत्रणेला चूना लावून परदेशात पळाल्यानंतर... घायवळला पळवण्यामागे चंद्रकांत पाटलांचा हात असल्याचा आरोप करत पुण्यातील गुंडगिरीला राजाश्रय असल्याचा आरोपच धंगेकरांनी केला... मात्र महायुतीतील मित्रपक्षावर आरोप केले जात असल्याने या प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांनी उडी घेत एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली..
मुख्यमंत्र्यांच्या तक्रारीनंतर महायुतीच्या नेत्यांवर टीका करु नका, अशा शब्दात शिंदेंनी धंगेकरांना समज दिलीय... मात्र धंगेकरांनी शिंदेंकडे दुर्लक्ष करत कारवाई झाली तरी बोलतच राहणार, अशी थेट भूमिका घेतलीय..खरंतर भाजप आणि शिंदेसेनेतील कुस्ती फक्त पुण्यातच नाही तर वेगवेगळ्या जिल्ह्यात असाच संघर्ष पेटलाय.. तो नेमका कसा?
नवी मुंबई आणि ठाण्यात वर्चस्वासाठी एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक संघर्ष
कल्याण डोंबिवली महापालिकेत रवींद्र चव्हाण आणि शिंदेसेनेत तीव्र मतभेद
बदलापूर, अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आमदार किसन कथोरे आणि शिंदे सेनेचे वामन म्हात्रे यांच्यातही वाद
रत्नागिरीत उदय सामंत भाजपसोबत जुळवून घेण्यास उत्सुक नाहीत
सिंधुदूर्गमध्ये नितेश राणे आणि शिंदेसेनेचे राजन तेली आणि केसरकर या नेत्यांमध्ये वाद आहेत
नाशिकमध्ये पालकमंत्रिपदावरुन दादा भुसे आणि गिरीश महाजनांमध्ये रस्सीखेच सुरु आहे
आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धंगेकरांना समज दिल्यानंतर धंगेकर आक्रमक झालेत.. यामागे गुन्हेगारीचं कारण आहे की भाजपला अस्थिर करण्यासाठीचं राजकारण? याचीच चर्चा रंगलीय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.