शाळा  साम टीव्ही
महाराष्ट्र

Pune : पुण्यात पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा बंदच राहणार! पहा काय म्हणाले महापौर...

राज्य सरकारने पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र आता ओमायक्रॉनच्या भीतीने मुंबई आणि पुणे महानगरपालिकेने सावध पवित्रा घेतला आहे.

अमोल कविटकर, पुणे

पुणे : राज्य सरकारने पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र आता ओमायक्रॉनच्या भीतीने मुंबई आणि पुणे महानगरपालिकेने सावध पवित्रा घेतला असून शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. मुंबई महापालिकेपाठोपाठ पुणे महापालिकेने देखील आता १५ डिसेंबरपासून पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार व महापौर महापौर यांच्यात ओमायक्रॉनच्या धर्तीवर शाळा सुरु करण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा १५ डिसेंबर नंतर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ डिसेंबरला पुन्हा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबई व पुणे महापालिकेच्या निर्णयाचे पडसाद आता राज्यातील प्रमुख शहरात उमटताना दिसत असून नाशिक महापालिकेने देखील १० डिसेंबर नंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय, याबाबत नाशिक महापौरांनी माहिती दिलीय. कोरोना संसर्ग आणि आता नवीन ओमायक्रॉन व्हेरियंट च्या पार्श्वभूमीवर महानगरांमध्ये आतापासूनच खबरदारी घ्यायला सुरुवात झाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Shocking: माझ्या अंगावर गाडी का घातली? बस थांबवत पैलवानानं एसटी चालकाची गचांडी पकडली | Video Viral

Crime: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याची हत्या, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

Maharashtra Rain Live News : - अनिलकुमार पवार, वाय एस रेड्डी, सिताराम गुप्ता आणि अरूण गुप्ता यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Crime : प्रियकराच्या मदतीने महिलेने पतीला संपवलं; क्राईम शो पाहून रचला हत्येचा कट

Thane Water Supply : ठाण्यात काही दिवस अनियमित पाणीपुरवठा, कारण काय?

SCROLL FOR NEXT