Pune Porsche Car Accident  Saam Digital
महाराष्ट्र

Pune Porsche Car Accident : अजित पवारांची नार्को टेस्ट करा'; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणावरून दमानियांनी अजितदादांना घेरलं

Anjali Damania on Ajit Pawar : अंजली दमानियांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नार्को टेस्टची मागणी केल्यानं पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय. दमानियांनी अजित पवारांबाबत अनेक सवाल उपस्थित केल्यामुळे राजकारण तापलंय.

Sandeep Gawade

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

अंजली दमानियांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नार्को टेस्टची मागणी केल्यानं पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय. दमानियांनी अजित पवारांबाबत अनेक सवाल उपस्थित केल्यामुळे राजकारण तापलंय, यावरचा हा विशेष रिपोर्ट..

पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलंय. या प्रकरणात अंजली दमानियांनी अजित पवारांचं नाव घेतल्यामुळे राजकारण चांगलंच तापलंय. अंजली दमानियांनी थेट अजित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केलीय. अजित पवार खोटं बोलत आहेत. त्यामुळे त्यांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला होता. तर हा आरोप पुणे पोलिसांनी फेटाळून लावलाय. मात्र अंजली दमानिया एका आरोपावर थांबल्या नाहीत तर त्यांनी अजित पवारांच्या भूमिकेवल संशय व्यक्त करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

दमानियांचे अजितदादांना सवाल

आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी पालकमंत्री म्हणून तुम्ही सीपी ऑफिसमध्ये ठिय्या मांडून का बसला नाहीत?

जेव्हा फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा तुम्ही पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या शेजारी का बसला नाहीत?

कुठलीही प्रक्तिक्रिया द्यायला ४ दिवस का लागले ? ते पण पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर का बोललात ?

घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होतात ?

तुमचे आणि अग्रवाल कुटुंबाचे आर्थिक संबंध होते का ?

क्षुल्लक गोष्टींवर भडकणारे अजित पवार, पत्रकार परिषदेत गांगरल्यासारखे का होते?

जर आरोप खोटे होते तर ते भडकले कसे नाहीत ?

पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी दमानियांनी केलेले आरोप मात्र अजित पवारांनी फेटाळून लावलेत. मी कुठल्याही आरोपीला पाठीशी घालण्यासाठी फोन करत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दमानियांच्या आरोपानंतर अजित पवारांभोवती संशयाचं ढंग जमू लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणात सरकार काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : नगराध्यक्षांपाठोपाठ आता नगरसेवकांचेही ठरले; काहींचे गणित जमले तर काहींचे बिघडले

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

SCROLL FOR NEXT