Maharashtra Politics 2024 : लोकसभा कामगिरीवर विधानसभेचं जागावाटप?; बिग ब्रदर छोट्या भावांचा मान ठेवणार का?

Maharashtra Politics 2024 Update : लोकसभा निवडणुकांचे निकाल लागण्यापूर्वीच राज्यात विधानसभेच्या जागांवरुन दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. महायुतीत लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरुन बरीच नाराजी होती.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागण्यापूर्वीच राज्यात विधानसभेच्या जागांवरुन दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. महायुतीत लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरुन बरीच नाराजी होती. त्यामुळे मित्रपक्षांनी विधानसभेसाठी आत्तापासूनच आक्रमक भूमिका घेतलीय. महायुतीचं जागावाटप मात्र लोकसभेच्या कामगिरीवर अवलंबून असेल अशी माहिती सुत्रांनी दिलीये, त्यावरचा हा रिपोर्ट..

लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जूनला लागणार आहे. मात्र त्याआधीच राज्यात विधानसभेच्या जागावाटपांचे वारे वाहू लागलेत. लोकसभेआधी राज्यात महायुती झाली. आता जागावाटपाचं गणित लोकसभेच्या विजयी जागांवर ठरणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीये.

लोकसभा निवडणुकीतील जागावाटप करताना महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगलीच राजी-नाराजी पाहायला मिळाली होती..या जागावाटपात सर्वाधिक जागा भाजपनं आपल्या पारड्यात पाडून घेतल्या तर सर्वात कमी जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या.त्यामुळेच आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाचा मुद्दा गाजतोय.त्यात लोकसभेत जी खटपट करावी लागली ती आता विधानसभेत होऊ नय़े अशी आक्रमक भूमिका घेत भुजबळांनी विधानसभेत 80 ते 90 जागा मिळाव्यात अशी मागणी केली. जाहीरपणे केलेल्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया देत भाजपच सर्वात मोठा पक्ष असल्याचं म्हंटलंय.

Maharashtra Politics 2024
Mumbai Coastal Road : कोस्टल रोडला गळती; मुख्य मार्गाला किती धोका? CM एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

फडणवीसांच्या भूमिकेनंतर भुजबळांनी भाजप मोठा पक्ष असल्याचं मान्य केलंय. मात्र इतर मित्रांचा सन्मान ठेवावा हे सांगण्यास ते विसरले नाहीत. भाजप सर्वात जास्त् जागा लढवणार हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मान्यच आहे. अजित पटार गटाचं सर्व लक्ष हे शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा जातात यावर असेल. कारण लोकसभेच्या जागावाटपात शिंदेंनी मारलेली बाजी ही नक्कीच अजित पवार गटाला जिव्हारी लागली असेल. मात्र हेच विधानसभेत होऊ नये याची खबरदारी आतापासूनच अजित पवार गटातील नेते घेत आहेत.

लोकसभेतल्या कामगिरीवर विधानसभेचं जागावाटप होणार असल्याची चर्चा जरी रंगलीय. यानुसार अजित पवार गटानं सर्व चार जागा जिंकल्या तरी त्यांना त्यांच्याकडे असलेल्या सर्व आमदारांनाही तिकीट मिळू शकणार नाही. त्यामुऴे अजित पवार गट हा निकष कितपत मान्य करेल याबाबत शंका आहे.

Maharashtra Politics 2024
CM Eknath Shinde Pre-Monsoon Review Meeting : CM एकनाथ शिंदेंनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा; NDRF, SDRF च्या बैठकीत काय झाली चर्चा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com