Pune Police Route March saam tv
महाराष्ट्र

Pune Police Route March: कोल्हापुरच्या घटनेनंतर पुण्यात अलर्ट! अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा "रुट मार्च"

Kolhapur Protest Update: राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे आक्षेपार्ह स्टेटस सोशल मीडियावर टाकल्यामुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे.

Chandrakant Jagtap

Pune Latest News: कोल्हापुरमध्ये मंगळवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पोलीस सतर्क झाले आहेत. पुण्यात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरातील अनेक ठिकाणी पोलिसांनी "रुट मार्च" काढला. पुणे पोलिसांकडून लोकांना कोणत्याही अफवांवर विश्वान न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यातील संवेदनशील भागात कुठलाही तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी रुट मार्च काढला. पुण्यात अद्याप कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही. सगळीकडे शांतता आहे अशी माहिती झोन २ च्या पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. (Breaking News)

कोल्हापुरामध्ये मंगळवारी काही लोकांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला होता. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत कोल्हापूर बंदची हाक दिली. काही संघटनांनी मोर्चा काढत शिवाजी चौकात मोठी गर्दी केली होती.

या आंदोलनादरम्यान दगडफेकीची घटना घडल्याची माहिती देखील समोर आली आहे. यानंतर आंदोलक आणखी आक्रमक झाले. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. या घटनेनंतर आता कोल्हापूरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. (Latest Political News)

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान पोलिसांकडून लोकांना कोणत्याही अफवांवर विश्वा न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कडक कवारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच जमाव बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Fire News: आधारवाडीतील इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

SCROLL FOR NEXT