Original vs Fake Charger: खरा अन् बनावट चार्जर कसा ओळखाल? वाचा सोपी ट्रिक्स

Sakshi Sunil Jadhav

चुकीच्या चार्जरचा परिणाम

आजकाल स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. पण चुकीचा चार्जर वापरल्यास मोबाईलचे नुकसान, बॅटरी फुगते, शॉर्ट सर्किट किंवा अगदी आग लागण्याचा धोका असतो. त्यामुळे खरा आणि बनावट चार्जर कसा ओळखायचा हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे.

Original vs Fake Charger

फरक कसा ओळखाल?

मार्केटमध्ये स्वस्त दरात मिळणारे चार्जर बहुतेकदा डुप्लिकेट असतात आणि त्यांची गुणवत्ता घातक असू शकते. पुढे दिल्या आहेत ७ सोप्या ट्रिक्स, वापरून तुम्ही सहजपणे ओरिजिनल आणि फेक चार्जरमध्ये फरक ओळखू शकता.

Mobile Charger Safety

पॅकिंगची गुणवत्ता तपासा

ओरिजिनल चार्जरचे पॅकिंग नेहमी मजबूत, नीट सील केलेले आणि ब्रँड लोगो स्पष्ट असतो. बनावट चार्जरचे पॅकिंग स्वस्त दिसते आणि स्पेलिंगमध्ये चुका असतात.

Original vs Fake Charger Identification Tips

केबल आणि प्लास्टिकची क्वालिटी

खऱ्या चार्जरची वायर लवचिक, मजबूत असते. फेक चार्जरमध्ये प्लास्टिक खूप पातळ, टोकदार किंवा कडक असू शकते.

Original vs Fake Charger Identification Tips

ब्रँड लोगो आणि प्रिंटिंग तपासा

डुप्लिकेट चार्जरवर लोगो हलकासा, धूसर किंवा वाकडा दिसतो. ओरिजिनलवर क्लियर, एम्बॉस्ड आणि अचूक लोगो असतो.

Original vs Fake Charger Identification Tips

चार्जरचे वजन तपासा

ओरिजिनल चार्जर जड आणि मजबूत असतो कारण त्यात क्वालिटी सर्किट वापरले जाते. फेक चार्जर हलका आणि आतून पोकळ वाटतो.

Original vs Fake Charger Identification Tips

आउटपुट व्होल्टेज व अॅम्पिअर तपासा

बनावट चार्जरवर आउटपुट स्पेसिफिकेशन चुकीचे किंवा धूसर प्रिंटमध्ये असते. तुमच्या फोनच्या कंपनीने दिलेल्या स्पेसिफिकेशन्सशी तुलना करा.

Original vs Fake Charger Identification Tips

चार्जिंग स्पीड लक्षात ठेवा

ओरिजिनल चार्जर फोन फास्ट आणि सलग चार्ज करतो. फेक चार्जर खूप स्लो चार्जिंग करतो किंवा कधी कधी चार्जिंग कट होते.

Original vs Fake Charger Identification Tips

वापरताना चार्जर गरम होणं

फेक चार्जर पटकन गरम होतात. ओरिजिनल चार्जर लांब वापरूनही कमी गरम होतात. चार्ज लावताना स्पार्क, कटकट आवाज किंवा जळका वास येत असल्यास चार्जर नकली किंवा खराब असल्याची शक्यता जास्त आहे.

Original vs Fake Charger Identification Tips

NEXT: Kitchen Hacks: कोणत्या भाज्यांमध्ये वाटण घातल्याने चव बिघडते?

Indian cooking errors
येथे क्लिक करा