Sakshi Sunil Jadhav
स्वयंपाकातले मसाले, वाटण आणि खास चवदार मिश्रण पदार्थाला उत्तम फ्लेवर देतात. पण काही भाज्यांमध्ये वाटण घातल्याने त्यांची नैसर्गिक चव बदलते.
पुढे आपण कोणत्या भाज्यांना साधे मसालेच शोभून दिसतात आणि वाटण का टाळावे? याच्या सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत.
भेंडीमध्ये पाणीदार किंवा जास्त मसाल्याचे वाटण टाकल्यास ती चीकट होते. हलकी फोडणी, कांदा-लसूण पुरेसं असतं.
दोडक्याची नैसर्गिक गोडसर चव असते. जास्त वाटण घातल्यास त्याची हलकी चव दडपते आणि भाजी जडसर वाटते.
पडवळमध्ये ग्रेव्ही किंवा नारळाचं वाटण वापरल्यास चव वेगळीच होते. ही भाजी साध्या मसाल्यातच उत्तम लागते.
भोपळा आधीच सॉफ्ट आणि गोडसर असतो. वाटण टाकल्याने भाजी गोड+जडसर लागते आणि भोपळ्याचा फ्लेवर हरवतो.
शेवग्याचा सुगंध आणि चव नैसर्गिक असतो. नारळाचं किंवा मसाल्याचं वाटण घातल्यास चव मिसमॅच होते.
कांद्याची पातीची साधी, पटकन शिजणारी कृतीच चांगली लागते. वाटण टाकल्यास चव अनैसर्गिक वाटते.
गवार साध्या मसाल्यात चविष्ट लागते. वाटण घातल्यास भाजी जडसर, कडवट आणि बेस्वाद होते.