Sanjay Gaikwad Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या; पुण्यात तक्रार दाखल

Pune News : आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे आणि शिळे अन्न मिळाल्याच्या कारणातून संजय गायकवाड यांना राग अनावर आला. यातून आमदार गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 

पुणे : आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण दिल्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर पुणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे.

पावसाळी अधिवेशन सुरु असून आमदार संजय गायकवाड हे मुंबईत आहेत. दरम्यान ते आकाशवाणी आमदार निवासात मुक्कामी असताना आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे आणि शिळे अन्न मिळाल्याच्या कारणातून संजय गायकवाड यांना राग अनावर आला. यातून आमदार गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. हा मुद्दा अधिवेशनाच्या सभागृहात देखील मांडण्यात आला.

पुणे पोलिसात तक्रार दाखल 

दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष यांची तक्रार असून चेतन पवार या अर्जदाराने गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तसेच संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. 

कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप 

संजय गायकवाड यांनी आकाशवाणी येथे असलेल्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्यामुळे मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर पोलिसात तक्रार देण्यासोबत एका संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे अभिप्रेत असताना कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप देखील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

IGI Aviation Recruitment: एव्हिशन सर्व्हिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Face Care: चेहऱ्यावर मध लावल्याने होऊ शकतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावधान

Mumbai: १५० वर्षाचा कर्नाक पूल 'सिंदूर' ब्रिज का झाला? वाचा मुंबईकरांना फायदा काय होणार

Mumbai Accident: मुंबईत बस आणि ट्रकचा भीषण अपघात, ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT