Pune ACB Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : घराचा ताबा मिळवून देण्यासाठी ३५ हजराची लाच; न्यायालयातील दोन लिपिक ताब्यात

Pune News : भाडेकरूला सदनिका खाली करण्यास सांगितले. मात्र भाडेकरू सदनिकेचा ताबा सोडत नसल्याने तक्रारदराने याबाबत न्यायालयात खटला दाखल केला होता न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निर्णय दिला

Rajesh Sonwane

पुणे : घरात ठेवलेला भाडेकरू सांगून देखील सदनिका खाली न करता घराचा ताबा सोडण्यास तयार नव्हता. याबाबत मालकांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर प्रकरण कोर्टात गेले होते. दरम्यान भाडेकरूच्या ताब्यातून घराचा ताबा मिळवून देण्यासाठी मालकांकडून ३५ हजार रुपयांची लाच घेताना न्यायालयातील दोन लिपिकांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे पुणे कोर्टात खळबळ उडाली आहे. 

पुणे शहराच्या हिंगणे भागात विशाल पार्क नावाची सदनिका आहे. त्यांनी सदरचे घर भाडेतत्त्वावर दिले होते. याठिकाणी राहत असलेल्या भाडेकरूला सदनिका खाली करण्यास सांगितले. मात्र भाडेकरू सदनिकेचा ताबा सोडत नसल्याने तक्रारदराने याबाबत न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निर्णय दिला असल्याने भाडेकरू यांना ताबा सोडण्याचे आदेश दिले होते.

आदेश पूर्ततेसाठी दोघांची नेमणूक 

या आदेशाची पूर्तता करण्यासाठी न्यायालयातील लिपिक रवींद्र पवार आणि बबन भुसारी यांना न्यायालयाने नेमून दिलं होतं. तर आदेशाची पूर्तता करून तक्रारदारांना सदनिकेचा ताबा देण्यासाठी या दोघांनी तक्रारदारांकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली. त्यावरून तडजोडीत ३५ हजाराची रक्कम देण्याचे मान्य केलं होता. मात्र तक्रादारांनी याबाबत एका व्यक्तीने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. 

दोघांना रंगेहाथ घेतले ताब्यात 

प्राप्त तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला. यानंतर पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये पवार आणि भुसारी यांनी तक्रारदाराला बोलावलं. याठिकाणी ३५ हजार रुपयांची रक्कम घेताना लाच लुचपत विभागाने पवार आणि भुसारी यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Archery World Championships: सुवर्ण कामगिरी; भारताच्या तिरंदाजांनी इतिहास रचला

Nagpur: दारूबंदी असतानाही विक्री; एकाला अवैध दारूसाठ्यासह अटक

दहिसरमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, पाहा व्हिडिओ

Instant Face Pack: अर्ध्या तासात येईल चेहऱ्यावर ग्लो, वापरा हा घरात तयार केलेला फेसपॅक

SBI Clerk 2025 : SBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! क्लर्क पदासाठी मोठी भरती, ६५८९ रिक्त जागा

SCROLL FOR NEXT