Fake Notes : पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात; जळगावात कारवाई, दोघेजण ताब्यात

Jalgaon News : शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन संशयित व्यक्ती ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली
Fake Notes
Fake NotesSaam tv
Published On

जळगाव : पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच जळगाव शहरात पुन्हा एकदा ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ हि कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बनावट नोटा, दुचाकी व मोबाईल असा एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रामुख्याने ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात आहे. काही महिन्यांपूर्वी भुसावलमध्ये मोठी कारवाई झाली होती. यानंतर जळगाव शहरात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन संशयित व्यक्ती ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. यानंतर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. 

Fake Notes
Parola Crime : दागिन्यांसाठी महिलेची हत्या; संशयिताला धुळे जिल्ह्यातून अटक

२४ हजार केले खर्च 

पोलिसांनी दोघांकडून सहा हजार रुपये मूल्याच्या ५०० रुपयांच्या १२ बनावट जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे या दोघांनी एकूण ३० हजार रुपयांच्या बनावट नोटा छत्रपती संभाजीनगर येथून आणल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी २४ हजार रुपये जळगावात खर्च केल्याची कबुली त्यांनी पोलिसांनी दिली. त्यांच्यासमवेत आणखी एक जण असल्याची माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. 

Fake Notes
PCMC News : हक्काचं घर वाचविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेवर धडक; चुकीचा आराखडा असल्याचा थेरगाव नागरिकांचा आरोप

पोलिसात गुन्हा दाखल 

या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी केली असता त्यांनी आणखी एका संशयिताचे नाव सांगितले. त्यालाही अटक केली. तिघे जण पोलिस कोठडीत आहेत. दोघांनी २४ हजारांच्या म्हणजेच ४८ नोटा जळगाव शहरात विविध ठिकाणी खर्च केल्याची माहिती दोघांच्या चौकशीतून पुढे आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com