Amit Shah Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Eknath Shinde Speech: 'अमित शहांचे नेतृत्व सहकार क्षेत्रासाठी वरदान...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव

CM Eknath Shinde On Amit Shah: अमित शहा यांच्या हस्ते 'सहकार से समृद्धी' पोर्टलचे उद्घाटन झाले.या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

Prachee kulkarni

Amit Shah Pune Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (शनिवारी) संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले. त्यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा आहे. या दौऱ्यामध्ये अमित शहा यांच्या हस्ते 'सहकार से समृद्धी' पोर्टलचे उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी मोदी- शहांमुळे देशात आमुलाग्र बदल झाल्याची प्रतिक्रिया दिली.

'सहकार से समृद्धी' पोर्टलचे उद्घाटन

दोन दिवसीय पुणे (Pune) दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते 'सहकार से समृद्धी' पोर्टलचे उद्घाटन झाले.  पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहांचे कौतुक केले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

"अमित शहा यांच्याकडून सहकार विभागात क्रांतीकारी निर्णय घेण्यात आले. त्यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे. नवं पोर्टल सहकार क्षेत्रातील नवा आयाम, सहकार क्षेत्रात कार्यकारी निर्णय घेतला आहे. शाहांनी एखादी गोष्ट ठरवली की ते करतातच. मोदी आणि शाहांमुळे देशात मोठे बदल होत आहेत. त्यांचं नेतृत्त्व सहकार विभागासाठी वरदान ठरत आहे.. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अजित पवारांकडूनही कौतुक...

दरम्यान, या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अमित शहा यांच्या कामाचे कौतुक केले. "अमित शहा हे महाराष्ट्राचे जावई आहेत. त्यामुळे त्यांचे राज्यावर खास प्रेम आहे. असे अजित पवार यावेळी म्हणाले. ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासुरवाडीवर विशेष प्रेम असते हे अमित भाईंच्या रूपानेही पाहायला मिळाले, असे म्हणत नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे देशाचे नेतृत्व करू शकतात," म्हणून हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

SCROLL FOR NEXT