Bhama Askhed Dam Saam tv
महाराष्ट्र

Bhama Askhed Dam: भामा आसखेड धरण अखेर १०० टक्के भरले; दमदार पावसाने पाणी पातळीत वाढ

Pune News : भामा आसखेड धरण अखेर १०० टक्के भरले; दमदार पावसाने पाणी पातळीत वाढ

रोहिदास गाडगे

खेड (पुणे) : मागील काही दिवस पावसाने दडी मारल्यानंतर पुणे, पिंपरी- चिंचवड परिसरात दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे (Khed) खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन धरण १०० टक्के भरले आहे. (Live Marathi News)

यावर्षी पावसाची उशिरा सुरुवात झाली. तर मागील एक ते दीड महिना तुरळक स्वरुपाचा पाऊस वगळता (Heavy Rain) पावसाने दडी मारली होती. यामुळे भामा आसखेड धरणातील पाणीसाठा गेले कित्येक दिवस ८३ ते ८४ टक्क्यांवर स्थिरावला होता. मात्र मागील दोन दिवस दमदार पडत असलेल्या पावसाने भामा- आसखेड धरण फुल झाले आहे. 

पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह चाकण औद्योगिक क्षेत्र आणि आळंदी शहराला पाणी पुरवठा करणारे खेड तालुक्यातील भामा आसखेड  धरण अखेर १०० टक्के भरले. यामुळे धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या सर्व शेतकरी, उद्योजक व सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अवकाळी पावसाने मोहोळ तालुक्याला झोडापलं ; कोण्हेरी भागातील पीक झाली आडवी

Valmiki Ramayan: बॉलिवूडमध्ये मोठी टक्कर; रणबीर कपूरच्या 'रामायण'पूर्वी 'वाल्मिकी रामायण' होणार प्रदर्शित

Ashok Kharat : महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातची करण्यात आली HIV टेस्ट, काय आला रिपोर्ट?

Petrol-Diesel: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, केंद्र सरकारकडून एक्साइज ड्युटीमध्ये मोठी कपात

Ladki Bahin Yojana: खुशखबर! या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹६००० जमा होणार; ४ महिन्याचा हप्ता एकत्र येणार?

SCROLL FOR NEXT