Ramdas Athawale News: एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री राहणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान

Beed News : एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री राहणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSaam tv
Published On

बीड : आत्तापर्यंत जे म्हणत होते खोक्यात आहेत; तेच आता म्हणतायेत की मुख्यमंत्री पद धोक्यात आहे. मात्र असं काही होणार नाही. जोपर्यंत (Eknath Shinde) एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत कुणीही मुख्यमंत्री होणार नाही. एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री राहणार असून शिंदेंच्याचं नेतृत्वाखालीचं २०१४ ची निवडणूक आम्ही लढवू; असं मोठं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले आहे. (Tajya Batmya)

Ramdas Athawale
Raju Patil News: बॅनर ऐवजी रस्त्यावर पडलेला एक खड्डा भरा; मनसे आमदार राजू पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

बीडमध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी विधान केले आहे. मंत्री आठवले म्हणाले, की उद्धव ठाकरेंचा देखील थयथयाट झाला. मात्र एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस यांनी फोडलं नाही. ते उद्धव ठाकरेंवर नाराज होते. कारण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मात्र मागच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे ते नाराज होते. ही खंत त्यांच्या मनात होती त्यामुळे त्यांनी संधी साधून नाराज आमदार सोबत आणले आणि त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली; असं देखील यावेळी रामदास आठवले म्हणाले.

Ramdas Athawale
Gauri Ganesh Festival: मुस्लिम कुटुंबीय जपतेय परंपरा; वीस वर्षपासून साजरा करताय गौरी गणपती सण

शरद पवार अस्वस्थ 

आज एवढं मोठं राजकारण झालं. (Sharad Pawar) शरद पवार यांना सर्वजण सोडून चालले आहेत. पुतण्या अजित पवार देखील सोडून गेले आहेत. त्यामुळे शरद पवार अस्वस्थ राहणारचं. मात्र आम्ही काही त्यांना फोडलं नाही. हा त्यांचा गैरसमज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com