पंढरपूर : गणपती बाप्पाच्या आगमनानंतर गौरीचे आगमन होत असते. अनेकांच्या घरी गौरीची स्थापना (Pandharpur) करून पूजन केले जात असते. असेच मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील पैगंबर व बेगम शेख या कुटुंबीयाने गौरी गणपती (Gauri Ganpati) सणाची परंपरा जपली आहे. परंपरेतून त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले आहे. वीस वर्षांपासून मुस्लिम कुटुंबीय गौरी गणपती सण मोठ्या उत्साहाने घरी साजरा करतात. (Maharashtra News)
बेगम शेख या घरोघरी जाऊन महिलांना बांगड्या भरण्याचा व्यवसाय करतात. व्यवसायाच्या निमित्ताने हिंदू धर्मियांच्या घरी गेल्यानंतर आपल्याही घरी गौरी गणपतीचा सण साजरा करावा अशी त्यांची इच्छा होती. अशातच त्यांचे सासरे पैगंबर शेख यांना बेगमपूर येथे जात असताना लक्ष्मीचे मुकुट व धागे सापडले होते. परंतु (Ganesh Festival) आपण मुस्लिम असल्याने आपल्या धर्मात गौरी गणपतीचा सण साजरा केला जात नाही. अशी त्यांच्या मनात शंका होती.
अखेर घेतला निर्णय
दरम्यान त्यांच्या ही शंका त्यांच्या पत्नी बेगम यांनी दूर करून आपल्या घरी गौरी गणपती सण साजरा करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वीस वर्षांपासून शेख कुटुंबीय मनोभावे गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यांच्या या उत्साहात गावातील मुस्लिम समाजासह सर्व जातींचे व धर्माच्या महिला सहभागी होतात. गौरी गणपती सण साजरा करत असल्या पासून आमच्या घरात सुख समृद्धी नांदत असल्याची भावना बेगम शेख यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.