Porsche Accident Saam tv
महाराष्ट्र

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Pune News : पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात आजच्या सहा महिन्यांपूर्वी म्हणजे १८ मे रोजीच्या मध्यरात्री अल्पवयीन कारचालक असलेल्या भरधाव आलिशान पोर्शे कारने आयटी इंजिनिअर असलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना जोरदार धडक दिली

Rajesh Sonwane

अक्षय बडवे

पुणे : कल्याणीनगर येथील पोर्शे अपघाताला आज सहा महिने पुर्ण होत आहेत. यानिमित्ताने तरुणाईने रस्त्यावर उतरून स्वत:ची एक मेणबत्ती आणत पेटवून आदरांजली वाहिली. विशेष म्हणजे राजकीय धामधूमित राजकीय पक्ष विरहीत ही आदरांजली वाहण्यात आली.

पुण्याच्या (Pune) कल्याणीनगर परिसरात आजच्या सहा महिन्यांपूर्वी म्हणजे १८ मे रोजीच्या मध्यरात्री अल्पवयीन कारचालक असलेल्या भरधाव आलिशान पोर्शे कारने आयटी इंजिनिअर असलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना जोरदार (Porsche Accident) धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आज (१८ नोव्हेंबर) सहा महिने पुर्ण होत आहेत. हे प्रकरण पुण्यासाठी आणि पुणे पोलिसांसाठी महत्वाचे ठरले होते. 

नाट्यमय घडामोडी तसेच श्रीमंतीचा माज तसेच मुलांना पोलीस ठाण्यात पिझ्झा देणे यासह पैशांच्या जोरावर व राजकीय पावरचा वापर आणि ससून रुग्णालयात रक्त बदल यामुळे राज्यभरात हे प्रकरण गाजले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून मुलाचे आई- वडिल, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह एक कामगार तसेच रक्त बदल केल्याच्या प्रकरणात मदत करणारे अशा सर्वांना अटक केली. त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र देखील दाखल केले आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.

दरम्यान, सदर घटनेला ६ महिने पुर्ण होत असल्याने या अपघातात जीव गमावलेल्या अनिश व अश्विनी यांना आदरांजली वाहण्यासाठी तरुणाईने अपघातास्थळी एकत्र जमत "एक मेणबत्ती पेटवून" त्यांना आदरांजली वाहिली. दोघांचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. माणुसकीच्या नात्याने तसेच एक समाज म्हणून तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहूयात, असे मत यावेळी तरूणाईने व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT