Pune News Saam Digital
महाराष्ट्र

Pune News : पुण्यातील अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये झेंडावंदन झालंच नाही, मोठं कारण आलं समोर

Pune Atal Bihari Vajpayee Medical College : स्वातंत्र्यदिनाची सर्व देशभर जल्लोष सुरू असताना पुण्यातील अट बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये मात्र झेंडावंदन झालंच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

साम टिव्ही ब्युरो

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाची सर्व देशभर जल्लोष सुरू असताना पुण्यातील अट बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये मात्र झेंडावंदन झालंच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. झेंडावंदन कॉलेजमध्ये न करता ते कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्याची कॉलेजच्या डीन शिल्पा प्रतिनिधी यांनी यांनी कबुली दिली आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांना ठेवलं राष्ट्रीय सणापासून वंचित रहावं लागलं आहे.

कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये काल बांगलादेशी घुसले अशी अफवा पसरली होती. त्यावेळ डीन शिल्पा प्रतिनिधी यांनी कोणतीही जबाबदारी काल घेतली नव्हती. मात्र आज 15 ऑगस्टच्या झेंडावंदनची तयारी नको म्हणून कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये झेंडावंदन केलं. विद्यार्थ्यांना याची कुठलीही कल्पना नव्हती विद्यार्थी कॉलेजमध्ये येऊन निघून गेले.

त्यामुळे झेंडावंदन न करता आल्याने मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी नाराज झाले आहेत. मेडिकल कॉलेज व कमला नेहरू हॉस्पिटल या दोन्ही संस्था वेगळ्या आहेत. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजच्या डीन शिल्पा प्रतिनिधी यांच्यावर विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.

पुण्याच्या मंगळवार पेठेतील पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात बुधवारी 3 संशयीत दहशतवादी घुसल्याची बातमी पसरली होती. हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाने त्या तिघा संशयितांना एका खोलीत बंद केलं. पोलिस कंट्रोलरूमला या याबाबत फोन करण्यात आला. तातडीनं पोलिसांचं पथक रुग्णालयात दाखल झालं. पोलिसांनी खबरदारी म्हणून रुग्णालयातून रुग्ण आणि नातेवाईकांना बाहेर काढलं. पोलिसांनी काल ३ संशियत लोकांचे फोटो रुग्णालय प्रशासनाला पाठवले होतेे आणि तेच ते तिघे रुग्णालयात तपासणीसाठी आले होते. त्यामुऴे अधिकच गोंधळ उडाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hadapsar Terminal: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हडपसरवरून धावणार ८ नवीन रेल्वे, कधीपासून होणार सुरू?

Success Story: पोलिस कॉन्स्टेबल असताना अपमान झाला, नोकरी सोडली, स्वाभिमानासाठी केली UPSC क्रॅक; उदय कृष्ण रेड्डी यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच

Ladki Bahin Yojana: १ लाख ४ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद; मिळणार नाही १५०० रुपये; यादीत तुमचं नाव आहे का?

independence day 2025 : 'मांस विक्रीचे फतवे नंपुसक करायचे'; मांसाहार बंदीवरून महायुतीत मतभेद,VIDEO

SCROLL FOR NEXT