Ladaki Bahin Yajana : 'लाडकी बहीण योजनेचा १७ ऑगस्टला राज्यस्तरीय लाभ हस्तांतरीत कार्यक्रम; महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अजित पवारांच्या सूचना

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ हस्तांतरणाचा १७ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. याच्या आयोजनाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत घेतला.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Digital
Published On

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर प्रातिनिधिक स्वरूपात जमा करण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाला येणाऱ्या महिला भगिनींना सर्व त्या सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून उर्वरित महिलांच्या खात्यावरील येत्या दोन ते तीन दिवसात रक्कम जमा करण्यात होईल, असेही ते म्हणाले.

Ladki Bahin Yojana
Maharashtra Politics: बारामतीमधून जय पवार निवडणुकीच्या रिंगणात? अजित पवारांकडून मिळाले संकेत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ हस्तांतरणाच्या १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा श्री. पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत घेतला. विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या कार्यक्रमासाठी लांबून महिला येणार असल्याने त्यांच्या येण्याजाण्याची, भोजन, पाणी आदी व्यवस्था चांगल्याप्रकारे करा. त्यांची आरोग्य तपासणी करावी. कार्यक्रमस्थळी वाहनतळ, पुरेशी बैठकव्यवस्था, मोबाईल टॉयलेट, परिसराची स्वच्छता आदी चोख व्यवस्था करावी. महिला भगिनींनी गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

Ladki Bahin Yojana
Maharashtra Politics : महायुतीचं टेन्शन वाढणार, महाविकास आघाडीचा मोठा डाव; विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंना दिली महत्वाची जबाबदारी, VIDEO

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार तसेच जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभ प्रदानाचा राज्यस्तरीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केल्याचे सांगितले. डॉ. दिवसे यांनी कार्यक्रमासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे नियोजन केले असे सांगितले.

Ladki Bahin Yojana
Chhatrapati Sambhajinagar News : न्याय मिळेना! स्वातंत्र्यदिनीच २ शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; कोल्हापूर, छ. संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com