सचिन कदम, रायगड प्रतिनिधी
Pune to Mangaon Tamhini Ghat Sunroof Accident: ताम्हिणी घाटात अतिशय भयानक अपघाताची घटना घडली आहे. दरडीचा दगड धावत्या कारच्या सनरुफ तोडून आत गेला अन् महिलेच्या डोक्यात पडला. या दुर्दैवी घटनेत महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, महिला पुण्याहून मानगावला निघाली होती. त्यावेळीच ताम्हिणी घाटात काळाने घाला घातला. स्नेहल गुजराती असे मृत महिलेचे नाव आहे. सुदैवाने या दुर्दैवी घटनेत इतर कुणालाही दुखापत झालेली नाही. दरम्यान, घाटातून प्रवास करताना सनरूफ वापरताना विशेष सतर्कता हवी, असा इशारा दिला जात आहे.
माणगाव ताम्हिणी घाटात सनरुफ असणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला आहे. दरडीचा दगड सनरूफ तोडून थेट कारमध्ये महिलेवर कोसळला. या दुर्दैवी घटनेत तिचा जागेवरच मृत्यू झाला. कोंडेथर गावाजवळ ही दुर्घटना घडली. स्नेहल गुजराती असे मृत महिलेचे नाव असून ती पुण्याहून रायगडमधील माणगावला निघाली होती. कोंडेथर गावाच्या हद्दीत कारच्या सनरुफवर डोंगरातून दगड कोसळला आणि कारमधील स्नेहल गुजराती यांचा मृत्यू झाला.
सनरूफ वापरणाऱ्या कार मालकांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाच आहे. घाटातून प्रवास करताना विशेष काळजी घ्यायला हवी, सांगण्यात येतेय. कारवर दरडीचा दगड कोसळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. कारमधील इतर प्रवाशांचा पोलिसांकडून जबाब घेतल असून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. कारवर दगड पडल्याचे व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये सनरूफ पूर्णपणे तुटल्याचे दिसतेय.
मिळालेल्या माहितानुसार, ताम्हिणी घाटात आज सकाळी हा अपघात झाला. एक गुजराती कुटुंब पुण्याहून माणगावकडे अलिशान कारने निघाले होते. त्या कारला सनरुफ होते. ताम्हिणी घाटातील कोंडीथर गावाजवळ आल्यानंतर आक्रीत घडलं. दरडीचा एक भाग अचानक कोसळला, काही दगड-गोटे कारवर पडले. त्यामधील एक मोठा दगड सनरूफ तोडून वेगात स्नेहल गुजराथी यांच्या डोक्यावर पडला. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी उपचाराधीच मृत घोषित केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.