Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : घरात अभ्यास करत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; सहा वर्षीय मुलाचा मृत्यू

Pune Junnar News : नागरी वस्तीत शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याकडून नागरिकांवर हल्ले करण्यात असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. जुन्नर तालुक्यात घडलेल्या एका घटने सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे

रोहिदास गाडगे

जुन्नर (पुणे) : नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढला असून हल्ले करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशी घटना जुन्नर तालुक्यातील कुमशेत गावात घडली असून घराच्या शेडमध्ये रात्री अभ्यास करत असलेल्या एका सहा वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला आहे. यात या चिमुकलीचा मृत्यू झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्याच्या जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या दहशतीने नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले असून काही ठिकाणी बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. दरम्यान कुमशेत परिसरात दोन बिबट्यांचे वास्तव्य असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे सायंकाळ झाल्यानंतर नागरिक घराच्या बाहेर निघण्यास देखील घाबरत आहेत.

घरात बसलेल्या मुलीवर हल्ला 

रात्री घरात बसून अभ्यास करत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा वर्षीय सिद्धार्थ केदारी या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून सिद्धार्थच्या कुटुंबीय हादरले आहे. दरम्यान या घटनेनंतर नागरिकांनी वन विभागावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संताप व्यक्त करत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

खांदला परिसरात वाघाच्या हल्ल्यात इसम जखमी

अहेरी तालुक्यातील खांदला शिवारात वाघाने हल्ला केल्याने एक इसम गंभीर जखमी झाले आहेत. खांदला येथील शिवराम गोसाई बामणकर असे वाघाच्या हल्यात जखमीचे नाव आहे. शिवराम हे बैल चारण्यासाठी जंगलात गेले असता ही घटना घडली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून तातडीने त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनेनंतर गाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT