Hinjewadi private tempo travel fire case Big twist Saam Tv News
महाराष्ट्र

Hinjewadi Travels Fire : हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलला आग, चार निष्पापांचा जीव गेला, प्रकरणात वेगळा ट्विस्ट; शॉर्ट सर्किटमुळे नव्हे तर...

Pimri Chinchwad Bus Fire : पिंपरी चिंचवड येथील हिंजवडी येथे एका खासगी टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागली होती. यात चार निष्पापांचा जीव गेला. मात्र, आता या प्रकरणात एक वेगळा ट्विस्ट आलाय.

Prashant Patil

मिताली मठकर, साम टीव्ही

पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलला आग लागून चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना ने आण करणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र, आता या प्रकरणात पायाखालची जमीन सरकेल असा फिल्मी ट्विस्ट आलायं. ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू ना गाडीतील शॉर्ट सर्किटमुळे झाला ना कोणत्याही अपघाताने. तर हा होता ठरवून केलेला कट, एक घातपात.

टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये काय घडलं?

व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या १४ कर्मचाऱ्यांचा टेम्पो ट्रॅव्हलरमधून प्रवास

ड्रायव्हरच्या पायाखाली अचानक आग

ड्रायव्हरसह पुढचे काही कर्मचारी वाचले

मात्र मागचा दरवाजा न उघडल्यानं ४ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू

मात्र, कायद्याच्या हातून कोणीच सुटत नाही आणि हाच या घटनेतला सर्वात मोठा ट्विस्ट ठरला. या प्रकरणी चालक जनार्दनविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र मॉर्निंग शिफ्टमध्ये कामावर निघालेल्या या ४ निष्पाप कर्मचाऱ्यांनी काय गुन्हा केला होता. टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागल्यानंतर चौघांनीही शेवटपर्यंत बसमधून बाहेर येण्याची धडपड केली. जळालेल्या बसमध्ये पाहिलं असता लोखंडावर ओरखडेत. ते चौघेही शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. जीवाच्या अकांताने ते दार उघडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तो दरवाजा उघडलाच नाही. त्यांच्या जगण्याची धडपड व्यर्थ ठरली. सांगा या चौघांचा काय दोष होता?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

Andheri Pedestrian Bridge: रेल्वेच्या पादचारी पुलावर महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी; मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

SCROLL FOR NEXT