Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : मुळशी पॅटर्न; दारवलीतील घटनेने खळबळ, गायींच्या गोठ्यात आढळला युवकाचा मृतदेह

Pune Mulshi News : मध्यरात्रीच्या सुमारास सागरच्या डोक्यात दगडाने वार करून खून करण्यात आला. तर घटनेनंतर मृतदेह गोठ्याच्या गेटजवळ ओढून आणून टाकण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Rajesh Sonwane

पुणे : मुळशी तालुक्यातील दारवली परिसरात थरारक घटना समोर आली आहे. या घटनेत गायींच्या गोठ्यात एका युवकाची डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मारेकरी कोण या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

मुळशी तालुक्यातील दारवली गावाशिवारात असलेल्या परमार बंगल्या शेजारील गायींच्या गोठ्यात ३२ वर्षीय युवकाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर भाऊराव माश्रम (रा. गंगापुरी, ता.वाई, जि. सातारा) असे मृताचे नाव आहे. सागर माश्रम हा सदर गोठ्यात काम करत होता. याच ठिकाणी त्याचा मृतदेह रक्ताचा थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

मध्यरात्री घडला थरार 

दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास सागर याच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याचा खून करण्यात आला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तर घटनेनंतर मृतदेह गोठ्याच्या गेटजवळ ओढून आणून टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे. घटनेची माहिती मिळताच मुळशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. 

जागा बेकायदेशीररीत्या ताब्यात 

हत्येची घटना परमार बंगला परिसरात घडली असून तो परिसर धनंजय देसाई यांनी बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मात्र सागर याचा खून नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला; याचा अद्याप उलगडा झालेला नसून पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jana Gana Mana vs Vande Mataram: राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यातील फरक काय? दोन्ही गीत गाण्याचे नियम काय?

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, VIDEO

Shocking: इतकी दारू प्यायली की तिला शुद्धच राहिली नाही, रॅपिडो बुक केली पण बसताच येईना; दिल्लीच्या तरुणीचा VIDEO व्हायरल

Dharashiv Crime: डान्सरसोबत अनैतिक संबंध! बायकोचा फोन आला अन् राडा झाला, तरुणानं घेतला टोकाचा निर्णय

Maharashtra Live News Update: आई वडिलांनीच घेतला चिमुकल्याचा जीव, मृतदेह नदीच्या पुलाखाली फेकला

SCROLL FOR NEXT