Pune Crime News Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime News: हप्‍ता न दिल्‍याने कुटुंबाला मारहाण

हप्‍ता न दिल्‍याने कुटुंबाला मारहाण

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

पुणे : पान टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. परंतु, टपरी चालविण्यासाठी दरमहा हप्ता मागुन तो देण्यास नकार दिल्याने (Pune News) गुंडाच्या टोळक्याने टपरी चालकाच्या कुटुंबाला बांबुने मारहाण केली. सदर घटना काळेपडळ येथील बालाजी पान शॉपसमोर रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे पान टपरी चालवितात. प्रशांत तिकोटे व त्यांच्या साथीदारांनी त्यांना पान टपरी चालविण्यासाठी दरमहा २ हजार रुपये हप्ता मागितला. हप्ता देण्यास त्यांनी नकार दिला. फिर्यादी त्यांचा मुलगा व पत्नी पान टपरीवर असताना गुंडांनी त्यांना बांबुने मारहाण करुन परिसरात दहशत माजविली. या मारहाणीत त्यांच्या पत्नीचा हात मोडून गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस (Police) तपास करत आहेत.

चार जण ताब्‍यात

याबाबत पुण्यात वानवडीमधील काळेपडळ येथील एका ५२ वर्षाच्या टपरी चालकाने वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत तिकोटे (रा. काळेपडळ, हडपसर) व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

Nepal Flood: महामारीचं संकट! एकाच घरातून २३ मृतदेह बाहेर काढले, ४००० अजूनही बेपत्ता, आतापर्यंत ९६२ जणांचा बळी

SCROLL FOR NEXT