Chakan News Saam tv
महाराष्ट्र

Chakan News : व्हिडीओ पाहून शिकला चोरीचा फंडा; इंजिनिअर तरुणांनी मिळून १८ दुचाकी

Pune Chakan News : पुण्याच्या चाकण परिसरातून बुलेट चोरी प्रकरणात यश थुट्टेसह प्रेम देवरे हे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारे दोघे ग्राहक शोधून द्यायचे

रोहिदास गाडगे

चाकण (पुणे) : ऑनलाईन गेममध्ये नुकसान झाल्याने पैशांची गरज भासत होती. यामुळे इंजिनिअरिंगचे शिक्षण झालेल्या मित्रांनी मिळून दुचाकी चोरीचा फंडा सुरु केला. मात्र चाकण पोलिसांनी या तरुणांना दुचाकी चोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यांच्याकडुन २६ लाख रुपयांच्या ११ बुलेटसह ७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

पुण्याच्या चाकण (Chakan) परिसरातून बुलेट चोरी प्रकरणात यश थुट्टेसह प्रेम देवरे हे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारे दोघे ग्राहक शोधून द्यायचे. त्यांना रवींद्र गव्हाणे आणि शुभम काळे हे उच्चशिक्षित तरुण देखील चोरीत सहभागी असायचे. दरम्यान खर्डेने युट्युबवर व्हिडीओ पाहून चोरीचा फंडा अवगत केला होता. ऑनलाइन कसिनो गेम मध्ये पैशाचे नुकसान झाल्यानं खर्डे या मार्गाला लागला होता. तर इतरांना झटपट पैसे मिळतायेत म्हणून ते याच्या आहारी गेले होते. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून (Bike Theft) दुचाकींची चोरी केली. 

या तरुणांनी मिळून एक- दोन नव्हे, तर तब्बल अठरा बुलेट चोरल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याचा तपास करत अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातुन या सर्वांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व एकमेकांचे मित्र असल्याचे देखील समोर आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

SCROLL FOR NEXT