Baramati Malegaon Election  Saam Tv News
महाराष्ट्र

Malegaon Karkhana Election : माळेगाव कारखाना निवडणुकीत तावरेंचं खातं उघडलं, महिला गटातून अजित पवारांना झटका

Baramati Malegaon Election : शरद पवार यांच्या बळीराजा सहकार बचाव पॅनेलला मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. अजित पवारांचे बहुतांश उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Prashant Patil

पुणे (बारामती) : उपमुख्यमंत्री अजित पवार थेट मैदानात उतरल्यामुळे राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे निकाल आता हळूहळू हाती येत आहेत. त्यामध्ये, अजित पवारांच्या पॅनेलमधील उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं चित्र सकाळपासून पाहायला मिळालं. मात्र, आता चंद्रकांत तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनेलच्या उमेदवार राजश्री कोकरे आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे, कारखाना निवडणुकीत महिला गटातून तावरेंच्या पॅनेलला मिळालेलं हे पहिलं यश म्हणता येईल. या निवडणुकीत एकूण ४ गटांनी आपले उमेदवार उभे केले असून अजित पवार आणि चंद्रकांत तावरे यांच्या गटातच प्रमुख लढत असल्याचे दिसून येत आहे. तर, शरद पवार यांच्या बळीराजा सहकार बचाव पॅनेलनेही उमेदवार उभे केले आहेत.

शरद पवार यांच्या बळीराजा सहकार बचाव पॅनेलला मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. अजित पवारांचे बहुतांश उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण ७,७२२ मतदानांपैकी शरद पवारांच्या उमेदवाराला फक्त २५१ मतं मिळाली. आता, महिला राखीव प्रवर्गातून तावरे गटाला पहिलं यश मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखाना मतमोजणीमध्ये महिला राखीव प्रवर्ग गटामधून अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवार संगीता कोकरे यांना ७३१ मते मिळाली आहेत. तर, सहकार बचाव पॅनेलच्या ज्योती मुलमुले यांना ६४८ मतं आहेत. दुसरीकडे तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलच्या उमेदवार राजश्री कोकरे यांना ७१३ मते, निलकंठेश्वर पॅनलच्या सुमन गावडे यांना ५५१ मतं मिळाली आहेत.

शरद पवारांचा अजितदादांना टोला

बारामतीधील माळेगाव साखर कारखाना निवडणुकीकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागून आहे. यात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्याचदरम्यान, या निवडणुकीवरून शरद पवारांनी अजित पवारांवर टीका केली आहे. 'सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये, मी माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांच्या निवडणुका लढलो नाही', असं शरद पवार म्हणाले. ते बारामतीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत असताना बोलले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Italy : इटलीत भीषण अपघात, रस्त्याच्या मधोमध विमान कोसळलं | VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डीच्या साई संस्थानला पुन्हा धमकीचा मेल...

Alcohol Price Hike: उत्पादन शुल्कात भरमसाठ वाढ, 'विदेशी' महागली, तळीरामांच्या देशीवर उड्या

Navi Mumbai: 'मराठी बोलता है' फैझानच्या टोळक्याकडून मराठी तरूणाला मारहाण; हॉकी स्टिकनं काळंनिळं होईपर्यंत मारलं

शाळेत भुत दिसल्याची अफवा; ५०० विद्यार्थी पळत सुटले;VIDEO

SCROLL FOR NEXT