Latur Ahmedpur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : पुण्यातून निवडणूक निकालसाठी गावाकडे गेला अन् खून झाला, चाकू-काठीने बेदम मारलं, लातूरमधील धक्कादायक घटना

Latur Ahmedpur Crime News : निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर अहमदपूर शहरात आलेल्या तरुणाची चाकू व काठीने अमानुष हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • अहमदपूरमध्ये २६ वर्षीय तरुणाची अमानुष हत्या

  • निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर घटना घडली

  • सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

  • मृत तरुण पुण्यात व्यवसाय करत होता

  • परिसरात भीतीचे वातावरण; तपास सुरू

राज्यात नुकत्याच नागरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून या निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अहमदपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादाची - कुरापत काढत २६ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून व काठीने मारहाण करुन अमानुष हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात अहमदपूर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणाचे नाव शोएब इसाक बागवान आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण शोएब हा पुण्यात व्यवसाय करत असून निवडणूक निकाल पाहण्यासाठी खास अहमदपूरला आला होता. शहरातील अबुबकर चौक ते अबुबकर मशिदीच्या दरम्यान रविवारी दि. २१ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास किराणा दुकानाजवळ शोएब आणि त्याचा मित्र उमेर खाजामौनोद्दीन बागवान हे बोलत उभे होते.

यादरम्यान या दोघांवर ६ जणांनी हल्ला केला. शोएबचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला उमेर बागवान हा तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात सिकंदर खलील शेख, समीर खलील शेख, आमीर खलील शेख, कलीम खलील शेख, गणीबी शेख व मालन बबलू शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

विवाहित असलेल्या शोएबच्या पश्चात पत्नी वतीन लहान मुले असून, या घटनेमुळे बागवान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक केदासे हे पोलिस निरीक्षक मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. हत्या कोणत्या कारणातून झाली, याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : पाठलाग केला, प्रवाशांना चाकूचा धाक; कोल्हापूर-मुंबई खासगी बस हायजॅक, सोनं-चांदीसह १.२२ कोटींचा मुद्देमाल लुटला!

तरुणाने बाथरुममध्ये ठेवले शारीरिक संबंध; अचानक गर्लफ्रेंडला प्रचंड रक्तस्त्राव, पुढील काही क्षणात मृत्यू

Maharashtra Live News Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग!

Milk Food Combinations: दुधासोबत कोणते पदार्थ खाल्याने Acidityची समस्या वाढते?

Cancer: महिलांच्या शरीरात हे बदल दिसले तर समजा कॅन्सर झालाय

SCROLL FOR NEXT