Public Apology of sushil kedia Saam tv news
महाराष्ट्र

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक सुशील केडिया वठणीवर

Public Apology of sushil kedia to raj thackeray: मराठी भाषेवर वादग्रस्त विधान केल्यानंतर सुशील केडिया यांनी आज राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला.

Bhagyashree Kamble

महिन्याभरापासून त्रिभाषा धोरणावरून निर्माण झालेला मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच तापला. यानंतर काल व्यावसायिक सुशील केडिया यांनी मराठी भाषेवरून राज ठाकरेंना ओपन चॅलेंज दिलं होतं. यानंतर मनसैनिकांनी त्यांचं ऑफिस फोडलं. दरम्यान आज केडिया यांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली आहे. व्हिडिओ शूट करून त्यांनी मराठी भाषा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकणार असल्याचं सांगितलं.

'माझी चूक मला मान्य आहे. त्याबाबत मी खेद व्यक्त करत आहे. मी माफी मागतो. मला माफ करा, माझे वक्तव्य मागे घेतो. लवकरच मी मराठी भाषा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकेल. हे बिघडलेले वातावरण नीट करा. माझी चूक मला समजली आहे. ती सुधारू इच्छितो. ते ट्विट मी तणाव आणि दडपणाखाली केले आहे', असं सुशील केडिया म्हणाले.

केडिया यांनी व्हिडिओ ट्विट राज ठाकरेंची माफी मागितली. 'नमस्कार, स्ट्रेसमध्ये असल्याकारणाने मी काल एक वक्तव्य केलं होतं. सध्या माझ्या वक्तव्यावर वादंग निर्माण झालं आहे. ज्यांना मराठी येत नाही, त्यांनी केलेल्या हिंसाचारावर मी ओव्हररिएक्ट झालो. मला माझी चूक उमगली. मी माझे शब्द मागे घेत आहे', असं केडिया म्हणाले.

तसेच, 'ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राहून मराठी जनता अस्खलित मराठी बोलतात. त्या पद्धतीने ३० वर्ष राहूनही मराठी भाषा आम्हाला बोलता येणार नाही. जर मला माझ्या मराठी भाषेच्या बोलण्याच्या गुणवत्तेबद्दल खात्री नसेल तर आणखी भीती वाटते. जर कोणताही शब्द चुकीच्या पद्धतीने बोलला गेला तर, अधिक हिंसाचार होईल. माझा मुद्दा समजून घ्या', असं केडिया म्हणाले.

'राज ठाकरेंबाबत मला नेहमीच कृतज्ञता आणि आदर वाटत आला आहे. कारण ते नेहमी आपल्या भूमिकेवर ठाम राहतात. ठाकरे नेहमीच सर्वांच्या मुद्द्यांना घेऊन भूमिका मांडतात. हिंदूत्वासाठी ते नेहमी उभे राहतात, यासाठी मी त्यांना नायक मानतो.

'मी त्यांचा फॅन आहे. एक फॉलोअर आणि त्यांच्याबाबत आतापर्यंत मी नियमितपणे पॉझिटिव्ह ट्विट करत आलो आहे. पण जेव्हा आपलेच लोक घाबरवतात, तेव्हा चुका घडतात. मी माझी चूक सुधारतो. मी आशा करतो वातावरण शांत होईल, असं केडिया म्हणाले आहेत.

'माझ्या मागील पोस्ट पाहा. तुम्हाला कळेल मी राज ठाकरेंचा आदर ठेवत आलो आहे. जेव्हा आपलीच लोक आपली घुसमट करतात, तेव्हा अशा चुका घडतात. मी माझी चूक कबुल करतो. माफी मागतो, आणि आशा करतो, की लोकांनी मराठी भाषेला चांगल्या भावनाने स्वीकारावे', असं म्हणत केडिया यांनी माफी मागितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT