Tipu Sultan : निलंग्यात टरबूज फोडून देवेंद्र फडणवीसांचा जाहीर निषेध! SaamTvNews
महाराष्ट्र

Tipu Sultan : निलंग्यात टरबूज फोडून देवेंद्र फडणवीसांचा जाहीर निषेध!

टिपू सुलतान संघटनेच्या वतीने जाहीर फडणवीसांचा जाहीर निषेध...

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनी टिपु सुलतान यांच्या विषयी अपशब्द वापरुन अपमान केल्याने निलंग्यात शेरे-हिंद शहिद टिपु सुलतान संघटनेच्या वतीने लातुर (Latur) जिल्ह्यातील निलंगा (Nilanga) येथे आज टरबूज फोडून जाहीर निषेध करण्यात आला.

हे देखील पहा :

26 जानेवारी रोजी मुंबई (Mumbai) येथील क्रीडा मैदानाला स्वातंत्र्य सेनानी हजरत शहिद टिपु सुलतान यांचे नाव देण्यास विरोध करीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजरत टिपु सुलतान यांच्याविषयी "टिपू क्रूरकर्मा शासक होते. त्यांनी हिंदुवर अत्याचार केले ते देशगौरव होऊ शकत नाही" म्हणत टिपू सुलतान यांचा एकेरी उल्लेख करुन अपमान केल्यामुळे समस्त मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. असे वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेध करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

टिपू सुलतान (Tipu Sultan) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अहमदपुर येथील बालाजी पांडुरंग कोटलवार या समाज कंटकानेही केले असून त्याच्यावर काल अहमदपुर येथे गुन्हा नोंद झालेला असून देवेंद्र फडणवीस यांच्यावरही असाच गुन्हा निलंगा येथेही दाखल करण्यात यावा व महाराष्ट्राचे वातावरण दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन शहीदांना न्याय व सन्मान द्यावा अशा मागणीचे निवेदन टिपू सुलतान संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशनला देण्यात आले. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूरमध्ये सतेज पाटलांना धक्का! ऋतुराज पाटील पराभवाच्या छायेत

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

SCROLL FOR NEXT