Saam Digital
महाराष्ट्र

Nashik Breaking News: परवानगीशिवाय ना मोर्चे, ना आंदोलने; नाशिकमध्ये पुढील १५ दिवस मनाई आदेश, नेमकं कारण काय?

Sandeep Gawade

Nashik Breaking News

नाशिक शहरात आजपासून मनाई आदेश लागू करण्यात आला असून १० जानेवारी ते २४ जानेवारीपर्यंत १५ दिवसांसाठी हा आदेश लागू असेल. मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन अथवा सभा घेता येणार नाहीत. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असणार आहे.

विना परवानगी मोर्चे, आंदोलनांना मनाई स्फोटक पदार्थ, शस्त्र बाळगण्यास, पुतळ्याचे दहन करण्यास देखील सक्त मनाई आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा, शेतकरी आणि अन्य संघटनांकडून देण्यात आलेला आंदोलनाचा इशारातसच मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी निर्णय घेतल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नाशिकमध्ये १२ ते १६ जानेवारी दरम्यान होणाऱ्या 'राष्ट्रीय युवा महोत्सवा'दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होणार आहे. १२ जानेवारीला म्हणजेच महोत्सवाच्या उद्घाटनादिवशी मिरची हॉटेल चौक ते तपोवन मैदानातील सभा स्थळापर्यंत तब्बल दीड ते दोन किलोमीटर या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या काळात नाशिकमध्ये मोठी हरदारी असणार आहे. शिवाय याच काळात शेतकरी आणि इतर संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकरी आणि अन्य संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणावरून आंदोलने सुरू आहे. त्यामुळे नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पोलिस प्रशासनाकडून मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT