Barshi Crime News SaamTv
महाराष्ट्र

Barshi News : बनावट चलनी नोटा प्रकरणातील आराेपी बार्शी न्यायालयातून पळाला, पाेलिस तपास सुरु

या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे करत आहेत.

विश्वभूषण लिमये

Barshi Crime News : बार्शी सत्र न्यायालयात (Barshi Court) सुनावणीसाठी आणलेल्या संशयित आरोपीने चक्क न्यायालयाच्या आवारातून धूम ठोकल्याचा प्रकार घडला आहे. बनावट चलनी नोटा प्रकरणी संबंधित संशयित आरोपी सोलापूर कारागृहात होता. गुरुवारी (१९ जानेवारी) त्याने पोलिसांना चकवा देत पळ काढला. संबंधिताच्या शोधासाठी पोलिस (police) दलाची पथके रवाना झाली आहेत.

गेला काही दिवसापूर्वी बनावट चलनी नोटा प्रकरणी संबंधितावर टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माढा तालुक्यातील बारलोणी येथील सिद्धेश्वर शिवाजी केचे असे संशयिताचे नाव आहे. टेंभुर्णी पोलिसांनी त्याला अटक (arrest) केली हाेती. सोलापूर येथील कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती.

याबाबतची तक्रार बार्शी (barshi) शहर पोलिसात मोतीराम हरिचंद्र पवार यांनी दिली आहे. त्यानुसार संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे करत आहेत. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Yoga Workout: फिट राहण्यासाठी रोज करा हे 4 योगा

दोरखंड बांधून उखाडला अख्खाच्या अख्ख्या लाखोंचा खजिना; चोरट्यांनी पळवलं SBIचं एटीएम, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या ३ ते ४ दिवसात मिळणार ३००० रुपये?

Shepu Batata Bhaji Recipe: शेपू बटाटा भाजी कशी बनवायची?

प्रचारादरम्यान भाजपचा पैशांचा पाऊस, शिंदे गटाच्या नेत्यांनी रांगेहाथ पकडले, निवडणूक आयोगाचे पथक घटनास्थळी दाखल|VIDEO

SCROLL FOR NEXT