Pravin Darekar Vs Manoj Jarange 
महाराष्ट्र

Pravin Darekar Vs Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या नसानसांत अहंकार आणि गर्व; भाजप नेत्याची टीका

Pravin Darekar Vs Manoj Jarange: भाजप नेते आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जुंपलीय. जरांगे पाटील यांचे आंदोलन कोणीतरी हायजॅक केल्याची टीका दरेकरांनी केलीय.

Bharat Jadhav

मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपलीय. आता भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी जरांगे यांच्यावर सणसणीत टीका केलीय. जरांगेच्या नसानसांत अहंकार आणि गर्व आल्याची टीका दरेकरांनी केलीय. तुम्ही करता ते फक्त मराठा समाजाच आंदोलन दुसर करेल ते सवतीच असं बोलणं कितपत योग्य आहे. मराठा समाजाच्या पाठबळावर अहंकार बळावलाय असल्याचं दरेकर म्हणालेत.

प्रविण दरेकर यांनी मराठा आरक्षणासाठी एक मोर्चा काढला होता. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली होती. त्यावरून दरेकर आणि जरांगे पाटील यांच्या वाद पेटलाय. आता राज्यात मराठा समाजाचे कोणतेच आंदोलन चालू नाहीये. नेते प्रविण दरेकर हे करत असलेल्या आंदोलनाशी आपला काही संबंध नाहीये. ते आंदोलन करून मराठा समाजात फूट पाडण्याची प्रयत्न करत आहेत. मराठा आंदोलनात यांना दंगली घडवून आणण्याच्या आहेत.

हे देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांचे काम आहे,असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. जरांगे यांच्या टीकेला प्रविण दरेकर यांनी उत्तर दिलंय. जरांगे पाटील यांना अंहकार आलाय, तुम्ही करता ते फक्त मराठा समाजाच आंदोलन दुसरे कोणी करेल ते सवतीच, असं बोलणं कितपत योग्य असल्याचं सवाल दरेकर यांनी केला.

सरकारला गर्व असता तर डझनभर मंत्री पायाशी येऊन बसले नसते. राज्याचे मुख्यमंत्री तुमच्याकडे आले हे कधीच घडलं नाही. उद्धव ठाकरे आणि पवार साहेब शिल्लक आहेत त्यांनाही येत्या काळात शिव्या शाप मिळतील हा अहंकारच असल्याची टीका दरेकरांनी केलीय. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांना पराभूत करणार असल्याचं निर्धार जरांगे केलाय. त्यावरुनही दरेकरांनी त्यांच्यावर टीका केलीय. राजकारणापेक्षा मराठा समाजाचे प्रश्न कुठ आहेत. लढवणार किती आणि पाडणार किती यावरच जरांगे बोलत आहेत. खोटं चित्र किती दिवस समाजाला दाखवणार फेक नरेटीव्ह चालवले जात असून जरांगे पाटील यांचे आंदोलन हे कोणीतरी हायजॅक केलंय असा आरोपही प्रविण दरेकर यांन केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

SCROLL FOR NEXT